Dailyhunt
MI vs RR Playing 11 : मुंबई इंडियन्स राजस्थानला भिडणार, हार्दिकची एन्ट्री फिक्स, कोणाचा पत्ता होणार कट? जाणून घ्या

MI vs RR Playing 11 : मुंबई इंडियन्स राजस्थानला भिडणार, हार्दिकची एन्ट्री फिक्स, कोणाचा पत्ता होणार कट? जाणून घ्या

मुंबई : आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांना भिडणार आहेत. राजस्थान संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत, तर मुंबईन एक सामना जिंकला असून दुसऱ्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

पाचवेळा विजेतेपद जिंकणारा मुंबईचा संघ कागदावर बलाढ्य दिसत असला तरी दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला होता मागील सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव याने कर्णधारापदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता आज होणाऱ्या सामन्यासाठी हार्दिक तंदुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पांड्या खेळत असल्यामुळे प्लेइंग ११ मधून कोणाला डच्चू मिळू शकतो? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्स संघामध्ये बदल म्हणजे हार्दिक पांड्या आल्याने सूर्यकुमार यादव याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळावं लागू शकतं. टीम मॅनेजमेंट विचार करून नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये सूर्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवल्याने मुंबईवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून शार्दूल ठाकूर, यालाही बाहेर बसावं लागू शकतं. दिल्लीविरूद्धच्या सामन्यामध्ये शार्दूल ठाकूर, कार्बिन बॉश यांनी अधिक धावा खर्च केल्या होत्या, पण त्यांच्या तुलनेमध्ये जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर आणि दीपक चहर यांनी चांगली कामगिरी केली होती.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे होणार असून तिथल्या हवामानाच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. आयपीएलमध्ये कालचा सामना पंजाब आणि लखनौ हा पावसामुळे रद्द करण्यात आला. यंदाच्या मोसमातील पावसामुळे रद्द करण्यात आलेला पहिलाच सामना ठरला आहे. आचच्या सामन्यात पावसाने खोडा घातला आणि सामना रद्द झाला तर राजस्थानला एक गुण आणि मुंबईला एक गुण मिळेल. याचा परिणाम थेट पॉइंट टेबलमध्ये दिसेल.

मुंबई इंडियन्सचा संभाव्य ११ संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, नमन धीर, मयंक मार्कंडे शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims