मुंबई : रायन रिकल्टनच्या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५ बाद २४३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे 'मुंबई'च्या चाहत्यांना विजयाची आशा निर्माण झाली होती.
मात्र, फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या मैदानावर ट्रेव्हिस हेड आणि हेन्रिच क्लासेन यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर 'हैदराबाद'ने लढत सहा विकेट आणि आठ चेंडू राखून जिंकली. घरच्या मैदानावर 'मुंबई'चा हा मागील पाचव्या लढतीतील चौथा पराभव ठरला. सामना संपल्यावर सनरायजर्स हैदरबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पॅट कमिन्स काय म्हणाला?
आपण वास्तववादी असण गरजेचं आहे, कारण आता आयपीएल बदलली असून पाच वर्षांपूर्वी २०० धावांचा पाठलाग करणं अवघड मानलं जात होतं.आता एक ओव्हर १२ धावांची जरी गरज असेल तर ते टार्गेट आपण पूर्ण करू शकतो. आता गोलंदाजांच्या हाती फारसं काही लागत नाही पण सामन्यात शेवटच्या टप्प्यात तुम्ही एक अचूक यॉर्कर चेंडू टाकला तरी संपूर्ण सामना पालटू शकतो. आमच्या संघातील ईशान मलिंगा चांगली कामगिरी करत असून सामने जिंकण्यामध्ये त्याच्याही वाटा आहे, असं कमिन्स याने म्हटलं आहे.
'मुंबईचा राजा' बाहेरच

