मुंबई - इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं नशीब उजळतंच असं नाही. काही कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, त्यांच्या पडत्या काळात कोणीही मदतीला धावूक येत नाही.
एकेकाळी गाजलेल्या कलाकारांची दयनीय अवस्थासुद्धा झाली आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलेली भोजपुरी अभिनेत्री मिताली शर्मा सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती आणि तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांमुळे तिला ओळख मिळाली. पण कालांतरानं तिला सिनेमांमध्ये काम मिळणं कमी झालं आणि मर्यादित प्रोजेक्ट्समुळे इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मूळची दिल्लीची असलेली मिताली शर्मा अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आली. पण, शहरात आल्यानंतर ती तिच्या कुटुंबापासून दुरावली. त्यामुळे तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. उत्पन्नाचा अभाव, कुणाचाही सपोर्ट नाही आणि इंडस्ट्रीकडून सतत मिळणारा नकार यामुळे अभिनेत्रीची परिस्थिती आणखी बिकट झाली आणि या सगळ्या अडचणींमुळे तिची मानसिक स्थिती खालावली.
मिताली शर्मानं भीक मागण्यास सुरुवात केली!
पोलिसांनी अभिनेत्रीला ताब्यात घेतलं
पोलिसांनी मितालीला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल केलं

