Dailyhunt
MPSC Group B Update: एमपीएससी 'गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता १४ मे पर्यंत करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

MPSC Group B Update: एमपीएससी 'गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता १४ मे पर्यंत करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

MPSC Group B Application Extension Date: नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख १४ मे आहे. बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्कासाठी १६ मेपर्यंत मुदत दिली आहे.

परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक अर्हता, आरक्षण, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रिया, दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना आणि परीक्षेचे टप्पे यांची माहिती आयोगाच्या वेबसाइटवर आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र 'गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा १४ जून रोजी राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. एकूण ५५३ पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्यास १४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती 'एमपीएससी'ने दिली.

'एमपीएससी'कडून सहायक कक्ष अधिकारी, गट-ब एकूण सहा पदे, राज्य कर निरीक्षक, गट-ब एकूण २३६ पदे आणि पोलिस उपनिरीक्षक, गट-ब एकूण ३१० पदांसाठी परीक्षा होत आहे. परीक्षेची जाहिरात आयोगाने नऊ एप्रिलला प्रसिद्ध केली. पूर्व परीक्षेच्या निकालाधारे पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. अर्ज सादर करण्याची मुदत ३० एप्रिलला संपली. मात्र, जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यास उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे १४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Admission after HSC: कमी गुण मिळाले तरी घाबरू नका! बारावी निकालात ७० हजारांची घट; यंदा 'या' कारणाने मिळणार सहज प्रवेश

MPSC Group B 2026 Vacancy: पदनिहाय रिक्त जागा:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-ब भरतीद्वारे तीन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण ५५२ जागा भरल्या जाणार आहेत.
१. सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित): ०६ रिक्त जागांसाठी भरती
२. राज्य कर निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित): २३६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
३. पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित): ३१० रिक्त पदे भरली जाणार आहेत.

MPSC Combined Exam Educational Qualifications: शैक्षणिक पात्रता:

१. सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
२.पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

३.अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.
४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

UGC NET June 2026 Exam: यूजीसी नेट परीक्षेची घोषणा! अर्ज प्रक्रिया सुरू, 'हे' दोन नवीन विषय समाविष्ट; जाणून घ्या पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा

MPSC Combined Exam how to apply: अर्ज कसा करावा?

  • सुरुवातीला mpsconline.gov.in/candidate/login या वेबसाईटवर जाऊन स्वतःचे अकाउंट तयार करावे (नोंदणी करावी). काही उमेदवारांनी यापूर्वी अकांउट तयार केले असेल तर त्यांना दुसरे अकाउंट तयार करण्याची गरज नाही.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक माहिती भरावी.
  • त्यानंतर केंद्राची निवड करून परीक्षा शुल्क भरावे.
  • त्यानंतर अर्जाच्या प्रतिची प्रिंट काढून ठेवावी.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims