Mumbai University CDOE Distance Admission 2026: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज दिनांक २८ मे २०२६ पासून सुरु करण्यात आली आहे.
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शिक्षण शुल्क, युजीसी (डीईबी) आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईची बलस्थाने आहेत.
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे.
पदवी स्तरावरील अभ्यासक्रमः
बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम ( कॉमर्स, अकाऊटंसी, आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत.पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमः
एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.FYJC Pune Cutoff: अकरावी प्रवेशात 'बीएमसीसी' आणि 'फर्ग्युसन'चा ४८२ गुणांचा रेकॉर्ड; पुण्यातील नामांकित कॉलेजांचा 'कट-ऑफ' जाणून घ्या
याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) व डिप्लोमा इन स्कूल मैनेजमेंट (डीएसएम) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविले जात आहेत. दुहेरी पदवीचा पर्यायही दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एम.ए. समाजशास्त्र ऑनलाईनः
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत.
FYJC Mumbai Cutoff: ९०% असूनही झेविअर्स आणि पोदार हुकले! मुंबईतील टॉप २५ कनिष्ठ महाविद्यालयांची पहिली कट ऑफ लिस्ट जारी; येथे तपासा टक्केवारी
ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक शिक्षण पद्धतीतून पूर्ण करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांची दालने खुली करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश्य आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा किमान पात्रता धारक विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून दिली जात आहे. सीडीओईची चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून नुकतेच पालघर येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते.

