Dailyhunt
Mukesh Chhabra: 'अक्षय खन्ना नव्हता पहिली पसंत, तीन अभिनेत्यांनी दिला नकार', धुरंधरमधल्या  रेहमान डकैत भूमिकेबद्दल मोठा खुलासा

Mukesh Chhabra: 'अक्षय खन्ना नव्हता पहिली पसंत, तीन अभिनेत्यांनी दिला नकार', धुरंधरमधल्या रेहमान डकैत भूमिकेबद्दल मोठा खुलासा

मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाची आणि त्यातील पात्रांची सर्वत्र चर्चा होताना आहे. या सिनेमातल्या प्रत्येक पात्राची तितकीच चर्चा झाली आहे.

मुख्य पात्रांसोबतच छोट्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या. धुरंधर च्या पहिल्या भागात रेहमान डकैत हे पात्र सगळ्यात जास्त गाजलं. दुसऱ्या भागात या रेहमान डकैतची कमी प्रेक्षकांना जाणवली. पण आता या सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टरने या रेहमान डकैत या भूमिकेबद्दल खुलासा केलाय.

'रेहमान डकैत'साठी अक्षय खन्ना नव्हता पहिली पसंती

अभिनेता अक्षय खन्ना यानं धुरंधर मध्ये 'रेहमान डकैत' ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली . मात्र, या भूमिकेसाठी अक्षय खन्ना हा पहिली पसंती नव्हती, असा खुलासा प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रानं केला आहे.

मुकेश छाब्रा यांनं एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, अक्षय खन्नाच्या आधी तीन मोठ्या अभिनेत्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला होता. यामध्ये दक्षिण साऊथ सिनेइंडस्ट्रीतला एक सुपरस्टार आणि बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्यांचा समावेश होता.

"आज ते नक्कीच पश्चात्ताप करत असतील"

मुकेश छाब्रा यानं सांगितलं की, ज्या अभिनेत्यांनी ही भूमिका नाकारली, त्यांनी दिलेली कारणं खूपच विचित्र होती. तो म्हणाला की, मी कोणाची नावं घेणार नाही, पण २-३ कलाकारांनी या भूमिकेला नकार दिला होता. मला खात्री आहे की ते आज त्यांच्या निर्णयाचा पश्चात्ताप करत असतील. त्यानं त्यांना हे देखील सांगितलं होतं की, हा खूप कलाकार असलेला मल्टी स्टारर चित्रपट आहे आणि यात मुख्यत्वे रणवीर सिंहचेच वर्चस्व असेल, त्यामुळं त्यांनी कलाकार नकार दिला होता. तसंच या चित्रपटासाठी जवळपास ४०० पात्रांची निवड करण्यात आली होती आणि संपूर्ण टीमनं दोन वर्षे यावर काम केलं होतं. विशेषतः 'यालिना' या पात्रासाठी तब्बल १००० पेक्षा जास्त ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्यास असाही खुलासा केला.

इथे वाचा धुरंधर २चा रिव्ह्यू

दिग्दर्शक आदित्य धर यांनी या नकारात्मक प्रतिसादाकडं लक्ष न देता पुढं जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ही भूमिका अक्षय खन्नाला ऑफर करण्यात आली, तेव्हा त्यानं तातडीनं होकार दिला आणि अवघ्या एका दिवसात स्क्रिप्ट फायनल केली.

चित्रपटाची मोठी झेप

'धुरंधर' चित्रपटानं १००० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला होता. आता दुसऱ्या भागानंही १५०० कोटींच टप्पा ओलांडलाय. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims