Dailyhunt
Mumbai AC Local: हार्बर रेल्वे मार्गावर 'एसी लोकल'च्या फेऱ्या वाढल्या! पनवेल-सीएसएमटी नवे वेळापत्रक; सामान्य लोकलवर काय परिणाम?

Mumbai AC Local: हार्बर रेल्वे मार्गावर 'एसी लोकल'च्या फेऱ्या वाढल्या! पनवेल-सीएसएमटी नवे वेळापत्रक; सामान्य लोकलवर काय परिणाम?

. टा. वृत्तसेवा, पनवेल: हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये १ मेपासून बदल करण्यात आला आहे. नवीन बदलांनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल स्थानकांदरम्यान धावणाऱ्या एसी गाड्यांच्या वेळेत महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.

ज्या गाड्यांच्या क्रमांकासमोर 'X' असे चिन्ह देण्यात आले आहे, त्या गाड्या रविवार आणि नामनिर्देशित सुट्ट्यांच्या दिवशी धावणार नाहीत. विशेष म्हणजे, सुट्ट्यांच्या दिवशी चालणाऱ्या सर्व एसी लोकलच्या नियोजित फेऱ्या या साध्या गाड्या असतील. ज्यामुळे प्रवाशांना नियमित सेवा मिळत राहील.

कसं असेल नवं वेळापत्रक?

सकाळी वडाळा रोडवरून पहिली एसी लोकल ०५:०६ वाजता सुटेल आणि ०६:०८ वाजता पनवेलला पोहोचेल. सीएसएमटी सकाळी ०७:१७, ०७:४०, १०:१० आणि १०:३४ वाजता पनवेलसाठी गाड्या उपलब्ध असतील दुपारी १.०७ वाजता सीएसएमटीवरून सुटणारी गाडी वाशीपर्यंत धावेल. संध्याकाळी ३:३६, ०६:३३ आणि ८:०० वाजता पनवेलसाठी मुख्य फेऱ्या असून, रात्रीची शेवटची एसी लोकल मध्यरात्री १२:२४ वाजता सुटून ०१:१३ वाजता वाशीला पोहोचेल.


पनवेल येथून मुंबईकडे जाण्यासाठी पहिली एसी लोकल सकाळी ०६:१७वाजता असेल (रविवार वगळून). त्यानंतर सकाळी ०८:४५, ११:४३ आणि दुपारी २:३१ वाजता पनवेलवरून सीएसएमटीसाठी गाड्या सुटतील. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ५:०७, ६:३७ आणि ८:०७ वाजता पनवेलहून प्रवाशांना एसी लोकलची सुविधा मिळेल. दिवसाची शेवटची परतीची गाडी रात्री १०:५८ वाजता पनवेलहन स्ट्रन मध्यरात्री १२:१७वाजता ला पोहोचेल.

एसी लोकल फेऱ्या वाढवल्या

दरम्यान, मुंबईत 1 मेपासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 14 एसी लोकल फेऱ्या वाढवणार असून यामुळे पहिल्यांदाच एसी लोकलची संख्या 100च्या वर गेली आहे. मुख्य मार्गावर सध्या एसी लोकलच्या दिवसभर 80 फेऱ्या असतात. हार्बरवर आता हा आकडा 28 वर पोहोचला असून एकूण फेऱ्यांची संख्या 108 इतकी झाली आहे. यामुळे मुंबईसह नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, पनवेलमधील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे.


परंतु. सामान्य लोकल ट्रेनऐवजी या एसी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या सामान्य लोकलपेक्षा कैकपटीने कमी असते. त्यामुळे पीक अव्हरदरम्यान या लोकलमुळे इतर नागरिकांचा खोळंबा होतो. पनवेल स्थानकावरून सकाळी 9च्या दरम्यान सुटणारी एसी लोकल नेहमी विलंबाने सुटते अशा प्रवाशांचा तक्रारी आहेत. त्यामुळे पुढील लोकलचं वेळापत्रक कोलमडतं आणि ट्रेन, रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढते.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims