Dailyhunt
Mumbai-Pune Missing Link: देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावर भव्य प्रकल्प, 'मिसिंग लिंक' म्हणजे नेमकं काय? मार्गाची वैशिष्ट्येही आहेत अनेक

Mumbai-Pune Missing Link: देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावर भव्य प्रकल्प, 'मिसिंग लिंक' म्हणजे नेमकं काय? मार्गाची वैशिष्ट्येही आहेत अनेक

पुणे: लॉन्ग वीकेंड आला मुंबईतील रहिवासी बाहेरगावी जायला निघतात. आज सकाळपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पण आजपासून या पुणे-मुंबई प्रवासाचं स्वरूपचं बदलणार आहे.

1 मे, महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील प्रवासासाठी 'मिसिंग लिंक'चा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, शनिवारी, 2 मे रोजी या मार्गावर वाहतूक सुरू होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्‍यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यमुंत्री (सावाजननक उपक्रम) श्रीमती मेघना साकोरे बोडीकरसुद्धा उपस्थित असतील.

देशातील पहिला द्रुतगती महामार्ग

2002 मध्ये सुरू झालेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग देशातील सर्वात पहिल्या द्रुतगती मार्गांपैकी एक मानला जातो. यामुळे पुणे जिल्ह्यात आणि परिसराती दोन दशकांपासून विकासाला चालना मिळाली आहे. या मार्गावर 1996-97मध्येच खालापूर ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) दरम्यान 13.3 किमी लांबीच्या मिसिंग लिंकचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर 2019मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं आणि अवघ्या 7 वर्षांनंतर 2026मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

1 मे रोजी दुपारी मिसिंग लिंकचं लोकार्पण होणार आहे. परंतु, कार्यक्रमानंतर मंडप आणि इतर सर्व अडथळे काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणं सुरक्षित नाही. त्यामुळे वाहनचालकांसाठी 1 मे रोजी रात्री उशीरा किंवा मध्यरात्रीनंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तेव्हाही या मार्गावर केवळ हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहनांना 31 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत मार्गावर प्रवेशबंदी असेल.


पावसाळ्यात कोंडीची समस्या

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा ते खंडाळा घाट एक्झित या मार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. हा मार्ग सध्या सहा पदरी आहे. पुढे जाऊन राज्य मार्गाच्या चार पदरी वाहतूकीशी एकत्र झाल्यामुळे हा मार्ग दहा पदरी होतो. पण पावसाळ्यात या घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होत असल्यामुळे एक लेन बंद ठेवावे लागते. त्यात घाटात धोकादायक वळणं असल्यामुळे प्रवास सुरक्षित नसून वाहतुकीचा वेग मंदावतो. 'मिसिंग लिंक'वरून प्रवास करताना वाहनचालकांना घाटाचं टेन्शन बिना घेता प्रवास करता येणार आहे.

कसा आहे प्रकल्प?

'मिसिंग लिंक'प्रक्लपामध्ये खालापूर ते खोपोली इंटरचेंज दरम्यान रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं आहे. हा 5.76 किमी रस्ता आता सहा पदरीऐवजी आठ पदरी करण्यात आला आहे. त्यापुणे खोपोली एक्झिट ते कुसगावपर्यंत 13.3 किमी भागावर दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्ट उभारले आहेत. या मार्गावरील एक बोगदा 8.9 किमी लांब आहे आणि दुसरा 1.58 किमी लांब आहे. हे दोन्ही बोगदे 'न्यू ऑस्स्रयन टनेमलुंग मेथड' (NATM) तुंत्रज्ञानाद्वारे बांधले गेले आहेत. प्रत्येक बोगदा 23.50 मीटर रुंद असून सह्याद्री पर्वतरांगांच्या मधून खोदून हे बांधण्यात आले आहेत. जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे म्हणून गिनीज बुकमध्ये यांची नोंदसुद्धा होणार आहे.




'मिसिंग लिंक'वरील दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून 180 मीटर खोल आहे. या बोगद्याचं बांधकाम ब्लास्टिंग या आधुनिक तांत्रिक पद्धतीने करण्यात आले आहे. पण 'मिसिंग लिंक'वर तांत्रिकदृशट्या सर्वात आव्हाणात्मक काम म्हणजे या दोन बोगद्यांमधील 650 मीटर लांब केबल-स्टेब पूल. टायगर व्हॅलीच्या मधोमध उभारला असलेला हा पूल 182 मीटर उंचीचे दोन स्तंभ ईणि 240 केबलवरती उभा आहे. 'ववुंड टनेल टेस्ट', 'फॅ हटग व टे्साइल टेस्ट' तसेच 'स्टे केबल टेस्ट' या आधुनिक चाचण्या करूनच या पुलाची सुरक्षितता तपासण्यात आली.

मिसिंग लिंक म्हणजे काय?

'मिसिंग लिंक'ला अनेकवेळा एक तांत्रिक चमत्कार असं संबोधण्यात आलं आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगात अशी महाकाय यंत्रसामग्री पोहोचवून बांधकाम करणं सोपं नव्हत. त्यात मान्सूनमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगर-दऱ्यांनी वेढलेला या भागात काम करणं आणखी कठीण होतं. तरीही अशा परिस्थितीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. नागरिक या मार्गावरून प्रवास करण्याची प्रतीक्षा करत आहेत. दोन विभागलेल्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना मिसिंग लिंक असं म्हटलं जातं. लोणावळ्यातील घाट आणि डोंगरांनी विभागलेल्या भागाला मिसिंग लिंक जोडतो.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims