म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात एकूण एक हजार ९०० झाडे बाधित होणार आहेत. त्यापैकी एक हजार २०० झाडे तोडण्यात येणार असून या प्रस्तावाला शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी देण्यात आली.
बहुतांश झाडे ही चारकोप तसेच गोरेगाव भागातील आहेत. उर्वरित ७०० झाडांचे पुनर्रोपण पनवेलमध्ये करण्यात येणार आहे.
७०० झाडे पुनर्रोपित करणार
मालाड माइंडस्पेस परिसरातील एमडीपी रोड या उपनगरातील महत्त्वाच्या मार्गावरील सर्वाधिक, ८१५ झाडे बाधित होणार असून त्यापैकी ११८ झाडे तोडली जाणार आहेत. माइंडस्पेस ते चारकोप टप्प्यात ४७ झाडे तोडण्यात येणार असून त्याबदल्यात ५७५ झाडे लावली जातील. तर गोराई इंटरचेंज ते दहिसर मार्गावर ८० झाडे तोडली जाणार असून १०२ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. बंगूरनगर ते मालाड माइंडस्पेस या टप्प्यात २३६ झाडे तोडली जातील. यासह अन्य भागातही झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची मिळणार जोड
'पुनर्रोपण मुंबईतच हवे'

