Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Naagin 7 Mistake : जे नाही दाखवायचं तेच दाखवलं! नागिन 7 च्या एपिसोडमध्ये मोठी चूक, प्रेक्षकांनी ट्रोल करताच एकता कपूरची प्रतिक्रिया आली

Naagin 7 Mistake : जे नाही दाखवायचं तेच दाखवलं! नागिन 7 च्या एपिसोडमध्ये मोठी चूक, प्रेक्षकांनी ट्रोल करताच एकता कपूरची प्रतिक्रिया आली

कता कपूरची लोकप्रिय मालिका, 'नागीन' चा सध्या सातवा सीझन चालू आहे. इतर सीझनप्रमाणे या ही सीझनला प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय. पण सध्या ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

अलीकडेच, या मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका 'ड्रॅगन'च्या सीनमुळे मोठ्या प्रमाणावर 'ट्रोल' केले गेले. AI-निर्मित ड्रॅगनच्या सीनवरून अनेकांनी एकता कपूरवर निशाणा साधला. एखता कपूरला टेलिव्हीजन क्विन मानले जाते. तिच्या शोमध्ये आता असे काही पाहायला मिळेल हे दिसताच अनेकांनी निराशा व्यक्त केली होती. अशातच आता, आणखी एका मोठ्या तांत्रिक चुकीमुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

प्रियांका चहर चौधरी मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये एक मोठी आणि स्पष्ट चूक निदर्शनास आली, ज्यामुळे प्रेक्षक पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. अनेक सोशल मीडिया युझर्सनी 'नागीन 7' मधील एक विशिष्ट सीन शेअर करत, ट्रोल केले आहे.

एडिटर्स 'क्रोमा' काढून टाकायला विसरले


Naagin 7 च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमधील सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा एक ॲक्शन सीन आहे, ज्यामध्ये एडिटर बॅकग्राऊंडमधील 'ब्लू स्क्रीन' म्हणजेच 'क्रोमा' काढून टाकायलाच विसरले आहेत. 'नागीण 7' ची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वाऱ्यासारखी पसरली आहे. हा सीन पाहिल्यानंतर, अनेक युझर्सनी निर्मिती आणि एडिटिंग टीम्सच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. निर्मात्यांकडून इतकी मोठी चूक नेमकी कशी होऊ शकते, असे अनेकांना कोडे पडले आहे. आता, या व्हायरल व्हिडिओवर एक प्रतिक्रिया समोर आली आहे.

'ब्लू स्क्रीन' मुले नागीन 7 ट्रोल


रविवारी 'नागीन'चा एक नवीन एपिसोड प्रसारित झाला, प्रेक्षकांनी एका मारामारीच्या सीनमध्ये (fight sequence) एक मोठी चूक पकडली. या विशिष्ट सीनमध्ये, एडिटर 'ब्लू स्क्रीन' काढायला विसर पडला होता. भाग प्रसारित होताच, प्रेक्षकांनी एडिटरची ही चूक लगेचच हेरली आणि त्या सीनचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली; तसेच या चुकीची खिल्ली उडवली.

या सीनध्ये अहाना म्हणजेच प्रियंका चहर चौधरीने साकारलेली भूमिका आपल्या शत्रूंशी लढताना दिसते. हा संपूर्ण सीन 'क्रोमा की' तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रित करण्यात आले होता. त्यातील एका विशिष्ट भागाचे एडिटिंग करताना एडिटरकडून चूक झाली. या सीनमध्ये कलाकार वायर्सच्या साहाय्याने हवेत लटकलेले दिसत आहेत, तसेच संपूर्ण production setup देखील उघडा पडला आहे. यानंतर सुरू झालेल्या 'ट्रोलिंग'वर , एकता कपूरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकता कपूरची प्रतिक्रिया


हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर करताना एका युझरने लिहिले: 'नागीन 7'चे काम उरकण्याची त्यांना इतकी घाई झाली होती की, त्यांना त्याचे योग्यरित्या एडिंगही करायलाही वेळ मिळाला नाही." अनेक सोशल मीडिया युझरर्सनी एकता कपूरच्या या मालिकेवर निशाणा साधला असून, तिची जोरदार खिल्ली उडवली आहे. एकाने लिहिले की "कदाचित त्यांना प्रेक्षकांना हेच दाखवायचे असावे की एडिटिंगसाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येक गोष्ट पूर्णपणे 'एआय'वर (AI) सोपवता येत नाही." दुसऱ्याने लिहिले की "असे दिसते की, एकतर एडिटिंग करताना एडिटरला झोप लागली होती किंवा मग 'जेमिनी'वर त्याचे फ्री लिमिट संपले होते." या कमेंटवर उत्तर देताना एकता कपूरने इतकेच लिहिले: "अगदी बरोबर." या घटनेपूर्वी, 'नागीन 7'च्याच एका मागील भागात 'एआय'चा वापर केल्याबद्दल झालेल्या ट्रोलिंगबाबतही एकता कपूरने स्पष्टीकरण दिले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims