म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक-कल्याणदरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दीर्घकालीन मागणीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा टोलवाटोलवीची भूमिका घेतली आहे. कसारा-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर आधीच ३६ उपनगरी गाड्या सुरू नवीन लोकलसेवा सुरू करणे हे मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक, पायाभूत सुविधा आणि देखभाल व्यवस्थेवर अवलंबून असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.
कसारा-इगतपुरी घाटाची रुंदी कमी असून, लोकल गाड्यांची रुंदी जास्त असल्याचे उत्तर दिल्याने केंद्र सरकारने नाशिककरांना एप्रिल फूल केल्याचा आरोप खासदार राजाभाऊ वाजेंनी केला आहे.
नाशिककरांच्या पदरी निराशा
सध्या मार्गावर लोकल चालवणे शक्य नाही
अडचणी दूर करण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाणार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणार का, तसेच ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याबाबत मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे.

