अमुलकुमार जैन, उरण: उरण तालुक्यातील जेएनपीएच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील जोडरस्त्याचा काही भाग अचानक खचला. सुमारे 68 कोटी रुपये खर्च करूण हा प्रकल्प तयार करण्यात आला होता.
या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करळ परिसरात राष्ट्रीय महामार्ग ४बी आणि राज्य मार्ग ५४ यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
8-10 महिन्यांत मार्ग खचला
या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, काही दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. मात्र, या घटनेमुळे बंदराशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी यापूर्वीच केला होता. त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या प्रकल्पावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.
प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता

