Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nepal Floods:  'काही तासांपूर्वी नेपाळमध्ये फोटो काढले तिथं सर्वकाही उद्ध्वस्त झालंय',  अभिनेता थोडक्यात बचावला

Nepal Floods: 'काही तासांपूर्वी नेपाळमध्ये फोटो काढले तिथं सर्वकाही उद्ध्वस्त झालंय', अभिनेता थोडक्यात बचावला

मुंबई: तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे अचानक आलेल्या भीषण पुरामुळं हाहाकार उडाला. या जलप्रलयात ९५ जणांचा मृत्यू झाला असून, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या विनाशकारी पुरामुळे ५०० जण बेपत्ता झाले असून, यामध्ये किमान १०५ भारतीयांचा समावेश आहे. या महापुरात भारतीय कलाकारांनाही मोठा फटका बसला आहे. चित्रपट अभिनेते अंकुर रतनही या महापुरात अडकले असते, मात्र काही तासांपूर्वीच ते तिथन निघाल्यानं थोडक्यात बचानवले. तर दुसरीकडे प्रसिद्ध बंगाली अभिनेते खराज मुखर्जी आपल्या पत्नीसह नेपाळमधील दुर्गम भागात अडकल्याचंही म्हटलं जात आहे.

अंकुर रतन अवघ्या १२ तासांच्या फरकाने वाचले

कैलास मानसरोवर यात्रेवर गेलेले अभिनेते अंकुर रतनयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते, त्यांची पत्नी शिल्पा सूचक आणि चुलत बहीण सोनाली हे सर्वजण पूर येण्यापूर्वी अवघ्या १२ ते १६ तास आधी त्याच अपघातग्रस्त भागातून सुरक्षित बाहेर पडले होते. "आम्ही ज्या ठिकाणी फोटो काढत होतो, तिथं काही तासांतच महापुराने सर्वकाही उद्ध्वस्त केलं. देवाची कृपा आणि आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सर्वजण वेळीच तिथून पुढं निघालो आणि सुरक्षित राहिलो," अशी माहिती अंकुर यांनी दिली.

अभिनेते खराज मुखर्जी आणि पत्नी नेपाळमध्ये अडकले

तर दुसरीकडं, 'कहानी' आणि 'स्पेशल २६' सारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलेले लोकप्रिय बंगाली अभिनेते खराज मुखर्जी आणि त्यांची पत्नी प्रतिभा मुखर्जी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी २० ऑगस्ट रोजी नेपाळला गेले होते. पुरामुळं रस्ते वाहून गेल्यानं आणि वाहतूक ठप्प झाल्यामुळं ते शूटिंग क्रू आणि अभिनेते रजतभ दत्ता यांच्यासोबत तिथंच अडकले आहेत.

खराज मुखर्जी यांच्या मुलानं (तमोघ्न) दिलेल्या माहितीनुसार, आईशी फोनवर संपर्क झाला होता, सर्वजण सुरक्षित आहेत. मात्र, दरडी कोसळल्यामुळं टेलिफोन नेटवर्कही अनेक ठिकाणी बंद झालं असून आता संपर्क होणं कठीण झालं आहे. क्रू मेंबर्स रस्तेमार्गे गोरखपूर आणि तेथून विमानानं कोलकाता इथं परतण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेपाळमध्ये भीषण परिस्थिती

भोटेकोशी आणि लेंडे खोला नद्यांना आलेल्या पुरामुळं रसुवा जिल्ह्यासह अनेक भागांत प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. अनेक भारतीय पर्यटकही तिथं अडकल्याची माहिती समोर येत असून, भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासन मदत व बचाव कार्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims