Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची मोठी संधी! १.८५ लाखांपर्यंत पगार; १० जुलैला 'वॉक-इन-इंटरव्ह्यू'

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची मोठी संधी! १.८५ लाखांपर्यंत पगार; १० जुलैला 'वॉक-इन-इंटरव्ह्यू'

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2026: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये विविध शैक्षणिक आणि वैद्यकीय पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील एकूण २२ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी येत्या १० जुलै २०२६ रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

NMMC Recruitment 2026 vacancies: रिक्त पदांचा सविस्तर तपशील

या भरती प्रक्रियेद्वारे वेगवेगळ्या १२ वैद्यकीय विभागांमधील पदे भरण्यात येणार आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
  • प्राध्यापक - एकूण ६ पदे: ॲनेस्थेशिया (०१), रेडिओ डायग्नोसिस (०१), ऑप्थॅल्मॉलॉजी (०१), पेडियाट्रिक्स (०१), ओबीजीवाय (OBGY) (०१), आणि ईएनटी (ENT) (०१).
  • सहयोगी प्राध्यापक - एकूण ५ पदे: ॲनेस्थेशिया (०१), रेडिओ डायग्नोसिस (०१) आणि ओबीजीवाय (OBGY) (०३).
  • सहाय्यक प्राध्यापक - एकूण ५ पदे: पॅथॉलॉजी (०१), ॲनेस्थेशिया (०१), ऑप्थॅल्मॉलॉजी (०१) आणि कम्युनिटी मेडिसिन (०२).
  • वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी - एकूण ६ पदे: पॅथॉलॉजी (०१), मायक्रोबायोलॉजी (०१), कम्युनिटी मेडिसिन (०१), जनरल मेडिसिन (०२) आणि जनरल सर्जरी (०१).

NMMC Recruitment 2026 Salary Details: मानधन आणि नियुक्तीचा कालावधी

सदर पदे ही पूर्णपणे कंत्राटी आणि तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यांची निवड ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी असेल. किंवा संबंधित पदावर कायमस्वरूपी प्राध्यापकांची नियुक्ती होईपर्यंत (यापैकी जे आधी होईल) तोपर्यंतच ही नियुक्ती वैध राहील. नियुक्त उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत मनपा सेवेत कायम केले जाणार नाही.

पुणे अन् ठाणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! दरमहा मिळणार २.८० लाखांपर्यंत पगार; इंजिनिअर्स आणि पदवीधरांसाठी Maha Metro ची भव्य भरती

विविध संवर्गासाठी निश्चित करण्यात आलेले मासिक एकत्रित ठोक मानधन खालीलप्रमाणे आहे:
अ.क्र.संवर्ग (Post)मासिक मानधन (रुपये)
प्राध्यापक (Professor)१ लाख ८५ हजार रुपये
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)१ लाख ७० हजार रुपये
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)१ लाख ३० हजार रुपये
वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident)१ लाख १० हजार रुपये

NMMC Recruitment 2026 शैक्षणिक पात्रता व नियम

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (National Medical Commission - NMC) नवी दिल्ली येथील ३० जून २०२५ च्या अधिसूचनेतील नियमांनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा गृहीत धरली जाईल.

NMMC Recruitment 2026 Interview Address मुलाखतीचा तपशील आणि ठिकाण

  • पात्र उमेदवारांच्या तांत्रिक कागदपत्रांची तपासणी करून त्याच दिवशी थेट मुलाखती घेतल्या जातील.
  • दिनांक: १० जुलै २०२६
  • वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत
  • ठिकाण: अधिष्ठाता कार्यालय, मांसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, १ ला मजला, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था, पार्क एव्हेन्यू रोड, कमलादेवी बिराजदार मार्ग, भूखंड क्र. ११/६ व ११/७, सेक्टर १५, नेरूळ, नवी मुंबई - ४००७०६.

पुण्यात JCB, HDFC बँक अन् टेक महिंद्रासह १३ कंपन्यांमध्ये थेट एन्ट्री! १० वी, १२ वी आणि पदवीधरांना संधी; 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना' सुरू

महत्त्वाच्या सूचना

गुणवत्ता यादी 'पीजीआयएमएस'च्या (PGIAMS) अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ७ दिवसांच्या आत सेवेत हजर होणे अनिवार्य आहे. विहित मुदतीनंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. पदभरती स्थगित करणे, रद्द करणे किंवा पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे राखीव आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims