New Labour Code Changes: भारतात नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी नोकरी करणाऱ्या कोट्यवधी सर्वसामान्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आतापर्यंत कंपन्या वेतन रचनेत बदल करून मनमानी करायची ज्यात पेन्शन आणि ग्रॅच्युइटीची रक्कम कमी करण्यासाठी अनेकदा मूळ पगार खूप कमी ठेवला जायचा.
मात्र, आता नवीन कामगार कायद्यांनी चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे.
कामगार कायद्यात बदल का केला?
कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याचे या बदलांमागचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तर, नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्यांच्या CTC च्या किमान 50% असला पाहिजे. यामध्ये पगारात भत्त्यांचा मोठा वाटा असतो, त्यांच्यावर या नव्या बदलांचा थेट परिणाम होईल. तुमच्या आयुष्यात काय बदल होणार हे आपण 60 हजारांच्या सीटीसीचे उदाहरण घेऊन समजून घेऊया.जुनं स्ट्रक्चर: कमी बचत, हातात जास्त पैसा
| घटक (Component) | रक्कम (₹) |
| एकूण सॅलरी (सीटीसी) | 60,000 |
| मूळ वेतन | 20,000 |
| पीएफ-कर्मचारी योगदान (मूळ वेतनाच्या 12%) | 2,400 |
| पीएफ-नियोक्त्याचे योगदान (मूळ वेतनाच्या 12%) | 2,400 |
| ग्रॅच्युइटी (अंदाजित मासिक कपात) | 962 |
| विशेष भत्ते | 34,238 |
| इन-हँड सॅलरी (मूळ पगार + विशेष भत्ते) | 54,238 |
नवीन स्ट्रक्चर: जास्त बचत, पण हातात कमी पगार
अशाप्रकारे नव्या कामगार कायद्यांतर्गत तुमचा CTC 60,000 रुपये असेल तर तुमचा मूळ पगार किमान 30,000 रुपये असला पाहिजे. तुमचा मूळ पगार 20,000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत वाढतो, तेव्हा तुमच्या PF आणि ग्रॅच्युइटीचे कॅल्क्युलेशन या वाढलेल्या रकमेच्या आधारावर केली जाईल.| घटक (Component) | रक्कम (₹) |
| एकूण सॅलरी (सीटीसी) | 60,000 |
| मूळ वेतन | 30,000 |
| पीएफ-कर्मचारी योगदान (मूळ वेतनाच्या 12%) | 3,600 |
| पीएफ-नियोक्त्याचे योगदान (मूळ वेतनाच्या 12%) | 3,600 |
| ग्रॅच्युइटी (अंदाजित मासिक कपात) | 1,443 |
| विशेष भत्ते | 21,357 |
| इन-हँड सॅलरी (मूळ पगार + विशेष भत्ते) | 51,357 |
अशा परिस्थतीत, दोन्ही परिस्थितीची तुलना केल्यास 60,000 रुपये सीटीसी असलेल्या कर्मचाऱ्याच्या हातात येणाऱ्या पगारात अंदाजे 2,881 रुपयांची घट होईल. पण हे पैसे वाया जाणार नाही तर तुमच्या पीएफ खात्यात जमा होतील आणि तुमच्या ग्रॅच्युइटी म्हणून तुम्हाला मिळू शकतात.
पीएफ लाभ: याआधी कर्मचारी आणि नियोक्ता यांचे एकूण पीएफ योगदान 4,800 रुपये असायचे जे आता वाढून 7,200 रुपये होईल. म्हणजे दरमहिन्याला 2,400 रुपयांची अतिरिक्त बचत होईल.
ग्रॅच्युइटी लाभ: मासिक ग्रॅच्युइटी कपात 962 रुपयांवरून वाढून 1,443 रुपये होईल, जी नंतर तुम्हाला उपयोगी येईल.

