Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PAK vs ENG Test : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात येड्याचा बाजार, इंग्लंडविरूद्ध मालिका सुरू असताना हेडकोचसह 7 खेळाडूंना माघारी बोलावलं; मिस्बाहचाही राजीनामा

PAK vs ENG Test : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात येड्याचा बाजार, इंग्लंडविरूद्ध मालिका सुरू असताना हेडकोचसह 7 खेळाडूंना माघारी बोलावलं; मिस्बाहचाही राजीनामा

मुंबई : कामगिरी ऊंचावण्यासाठी थेट उपाययोजना करण्याऐवजी घाऊक बदलाची मालिका पाकिस्तान क्रिकेटमध्ये कायम आहे. ५ वर्षांत ११ प्रशिक्षकांना नारळ दिलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोडांने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीपूर्वी संघातील ७ खेळाडूंना डच्चू दिला आहे.

हे बदल करताना दिर्घकालीन उपाय केल्याचा विचार दिसत नाही.

पाकिस्तानने इंग्लंडमधील पहिली कसोटी डावाने गमावली, तर दुसरी कसोटी १९४ धावांनी. मालिकेतील तिसरी कसोटी नऊ सप्टेंबरपासून एजबेस्टन येथे आहे. या कसोटीपूर्वी हे नाट्य घडले आहे. हे बदल करताना राष्ट्रीय निवड समितीस विचारातही घेण्यात आलेले नाही. त्यामुळे मिस्बाह-ऊल-हक यांनी राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार पदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

सात बदल कोणते?

सर्फराझ अहमद आणि उमर गुल यांना अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आले आहे. तसेच मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान आघा, अली उस्मान, आमेर जमाल, अवैस अफर आणि खुर्रम शहजाद यांना संघातून मुक्त करण्यात आले आहे. याशिवाय अराफत मिन्हास, मोहम्मद इम्रान धाकटा, साद बेग, सईम अयुब, मोहम्मद इम्रान रंधवा, रझातुल्ला आणि अब्दुल्ला फझल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वड समितीचे मिस्बा-उल-हक यांचा राजीनामा

मिसबा यांनी राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. पीसीबीने अद्याप मिस्बाह यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यांनी लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार पदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७मध्ये पाकिस्तानचे सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून निवृत्त झालेले मिस्बाह यांनी गेल्या काही वर्षात पीसीबीमध्ये अनेक पदे भूषवली आर्हत. २०१९ मध्ये त्यांची मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पुढे २०२१मध्ये त्यांनी मुख्य प्रशिक्षक पदाचाही राजीनामा दिला. २०२३मध्ये त्यांनी पुन्हा पीसीबीमध्ये पुनरागमन केले होते.

धक्कादायक...

  • वगळलेला जमाल याचे विंडिजविरुद्धच पुनरागमन, तर उस्मान आणि झफर यांची याच मालिकेसाठी निवड
  • उस्मानच्या हेडिंग्ले येथील कसोटीत एका डावात पाच विकेट त्यानंतरही त्याला निरोप
  • रिझवान यष्टीरक्षणात यशस्वी, पण फलंदाजीत अपयशी, त्याच्या दोन कसोटीत मिळून ४१ धावा
  • सलमान आघा हा टी-२० संघाचा कर्णधार, तो पहिल्या कसोटीच्यावेळी बदली कर्णधार. मात्र दुसऱ्या कसोटीसाठी डच्चू
  • विडिज दौऱ्यानंतर नकोसा फझल ता अचानक संघात
  • वल्र्ल्ड कप टी-२०नंतर पाक संघाबाहहेर गेलेल्या अयुबला अचानक संधी
  • प्रामुख्याने नवोदितांना प्रथम श्रेणी सामन्याचा अनुभव
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims