Dailyhunt
PBKS vs SRH: पंजाबचं नेमकं कुठं चुकलं? पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं धडाधड कारणंच सांगितली

PBKS vs SRH: पंजाबचं नेमकं कुठं चुकलं? पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं धडाधड कारणंच सांगितली

हैदराबाद: सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल 2026 चा सामना रंगला. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादच्या संघाने 235 धावा केल्या.

याउलट पंजाबला 202 धावा करता आल्या. पंजाबच्या संघाने 33 धावांनी सामना गमावला. पंजाबने सलग तिसरा सामना गमावला आहे. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला पाहा.

Shreyas Iyer म्हणतो की, 235 धावांची एकूण धावसंख्या थोडी जास्त होती, कारण त्यांनी अनेक झेल सोडले आणि हैदराबादच्या डावाच्या अखेरीस कटर चेंडूंनी खेळपट्टीवर जास्त पकड घेतल्यामुळे 30-40 अतिरिक्त धावा दिल्या. या खेळपट्टीवर गोष्टी कशा करायच्या हे हैदराबादने त्याला दाखवून दिले. लक्ष केंद्रित करणे आणि मनात शंका येऊ न देणे महत्त्वाचे आहे. अय्यर कूपरच्या फलंदाजीच्या शैलीचे श्रेय देतो आणि म्हणतो की, कूपरची विचारसरणी उत्कृष्ट आहे; त्याने भूतकाळात आणि आजही संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. श्रेयस म्हणतो की, चहल निर्भयपणे खेळला, विशेषतः डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध; पण त्याच्या गोलंदाजीवर झेल न घेणे हे त्याच्यासाठी आणि संघासाठी दुर्दैवी होते."

236 धावांच्या विशाल लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पंजाबचा डाव कोसळला. पहिल्याच षटकात त्यांची पहिली विकेट पडली. प्रियांश आर्य अवघ्या 1 धावा करुन बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात नितीश रेड्डीने प्रभसिमरनला केवळ तीन धावांवर बाद केले. श्रेयस अय्यरही पाच धावा करुन बाद झाला. स्टॉइनिसने 28 आणि सूर्यांश शेडगेने 25 धावा केल्या. कूपर कॉनेलीने निश्चितच एक शानदार शतक झळकावले, पण त्याच्या धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.

या पराभवानंतर पंजाबला मोठा फटका बसला आहे. इतके दिवस पंजाब जी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती ती आता एका क्रमांकाने घसरुन दुसऱ्या स्थानावर आली आहे. तर हैदराबादच्या संघाने इतके दिवस जी पंजाब जी पहिल्या स्थानावर कायम होती ते स्थान पटकावण्यात यश मिळवले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims