Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pravin Tarde : 'देवावर सिनेमा केला म्हणून हिट झाला' म्हणणाऱ्यांना प्रवीण तरडे यांची चपराक; म्हणाले, 'अशांना मी नाही जुमानत'

Pravin Tarde : 'देवावर सिनेमा केला म्हणून हिट झाला' म्हणणाऱ्यांना प्रवीण तरडे यांची चपराक; म्हणाले, 'अशांना मी नाही जुमानत'

मुंबई - प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २' या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'देऊळ बंद २' सिनेमानं १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

मात्र, काही जण सिनेमावर टीका करत आहेत. 'देवावर सिनेमा केला म्हणून हिट झाला', असं काहींचं म्हणणं आहे. यावर आता प्रवीण तरडे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रोलर्सना प्रवीण तरडे यांचं सडेतोड उत्तर

'काही लोकांचा प्रश्न आहे की, सिनेमा देवावर बनवण्यात आला आणि अशा देवावर हा सिनेमा तयार करण्यात आला आहे, ज्यांचं महाराष्ट्रात प्रचंड प्रस्थ आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल?' असं एका मुलाखतीदरम्यान प्रवीण यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रवीण तरडे म्हणाले की, 'अशा वृत्तीच्या लोकांना मी काय सांगणार? मी माझ्या पॅटर्नने उत्तर दिलं पाहिजे ना! नाहीतर मी असं म्हटलं की, नाही रे असतात काही माणसं अशी, त्यांची देखील मतं असतात. तर, हे खोटं वाटणार की नाही? ते प्रवीण तरडेंना सूट नाही होणार'



'मी अशा लोकांना नाही जुमानत. अशा लोकांना झालेला त्रास पाहून मला आनंद होतो. मला काम करण्याची प्रेरणा मिळते. पुढे काय करायचं आहे, हे मला ठळकपणे कळतं. त्यामुळे अशा लोकांच्या विचारांचा त्रास कशाला करुन घ्यायचा. त्यांना घरी कुणी जुमानत नाही, म्हणून ते इथे व्यक्त होतात. जे सोशल मीडियावर निगेटिव्ह लिहिणारे असतात ना, त्यांना घरात खूप त्रास असतो. आपल्याबद्दल बोलून ते मन मोकळं करतात. आपल्याला त्याचं पुण्य मिळतं. कारण आपल्यामुळे कुणीतरी मोकळं होतं.' असं प्रवीण यांनी 'द पोस्टमन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

दरम्यान, 'देऊळ बंद २' या सिनेमामध्ये मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'देऊळ बंद २' सिनेमाच्या शेवटी 'देऊळ बंद ३' सिनेमाची झलक दाखवण्यात आली असून सिनेमाचा तिसरा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims