Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pruthviraj Mohol : 'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम कुस्तीवेळी अजितदादांनी मला विचारलं होतं की...; पृथ्वीराज मोहोळने सांगितली खास आठवण

Pruthviraj Mohol : 'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम कुस्तीवेळी अजितदादांनी मला विचारलं होतं की...; पृथ्वीराज मोहोळने सांगितली खास आठवण

मुंबई : यंदा साताऱ्यात झालेल्या 'हिंद केसरी २०२६'च्या अंतिम फेरीमध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांनी धडक मारली होती. दोघांच्या प्रवेशामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्रातच येणार हे निश्चत झाले होते.

पण त्यानंतर कुस्ती सुरू झाल्यावर काही सेकंदातच महेंद्रने टाकलेल्या एका डावाने पृथ्वीराजला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने कुस्तीतून माघार घेतल्याने महेंद्रला विजयी घोषित केले गेले होते. महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्राचा १० वा हिंद केसरी मल्ल ठरला होता. याच पार्श्वभूमीर पृथ्वीराज मोहोळ याने 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यावेळी आखाड्यात नेमकं काय झालेलं? याबाबत सविस्तरपणे बातचीत केली. यावेळी बोलतान पृथ्वीराजने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये अजित दादांसोबत झालेल्या बोलण्याबाबत माहिती दिली आहे.

अजित पवार पृथ्वीराजला काय म्हणालेले?

मी दादांना स्टेजवर भेटलो होतो, ते कुस्ती लावायला आले होते. माझी आणि शिवराज राक्षे याची कुस्ती होणार होती. त्यावेळी शिवराजला येण्यासाठी लेट झालं होतं. त्यावेळी दादा बोलले, पैलवान काय चाललंय, यावेळेस तयारीत दिसताय. आम्हाला वेळ भेटला की तुमची कुस्ती बघतो बरं का? चांगली तयारी केली आहे. त्यासोबतच दादांनी वजनही विचारलं होतं. नंतर दादांनी भेटायलाही बोलावलं होतं की पण ते अधिवेशनात असल्यामुळे शक्य झालं नाही. कुस्तीला जाताना पैलवान कधी स्माईल करत नाही. दादा माझ्यासोबत बोलत असताना एक स्माईल असल्याची आठवण पृथ्वीराज मोहोळ यांनी सांगितली.


महेंद्रने टाकलेला डाव लिगली नाहीये, तो पूर्ण होल्ड अनलिगलच होता. महाराष्ट्राने पाहिलेला आहे, ९० अशांचा स्कोअर होता. पुढे गुडघा लावताय आणि दोन्ही हाताने पकडून माझा हात वर नेत आहात याला परवानगीच नाहीये. माझ्या जागी दुसरा पैलवान असता करियर बर्बाद आहे. एखाद्याची पैलवानकी बास करायची असं नाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय पैलवान आहात, तुमच्याकडे खिलाडूवृत्ती असालयला हवी. या पैलवानकडून सारखं असंच होत आहे. हिंद केसरीच्या सेमी फायनलमध्ये त्याच्या गावाशेजारच्या पैलवानाला पंचांनी शिट्टी वाजवली तरी तुम्ही ढकलून देत आहात. तिथं पण त्याची भांडणं झाली आहेत. तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा, असं म्हणत पृथ्वीराज मोहोळ याने महेंद्रवर निशाणा साधला.


दरम्यान, या संपूर्ण मुलाखतीमध्ये पृथ्वीराज मोहोळ याने त्याचा खालकर तालीम ते हिंद केसरीच्या फायनलपर्यंतचा कुस्ती क्षेत्रातील प्रवास सविस्तरपणे सांगितला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims