Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime: केतनशी साखरपुडा, चेतनसोबत अफेअर; मग हा तिसरा कोण? सियाचा नवा VIDEO समोर; आईला तोंडावर पाडलं

Pune Crime: केतनशी साखरपुडा, चेतनसोबत अफेअर; मग हा तिसरा कोण? सियाचा नवा VIDEO समोर; आईला तोंडावर पाडलं

पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणाच्या तपासातून दररोज नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत.

सियाचे चेतन सोबत प्रेम संबंध असल्यानं तिनं लोहगडाच्या कड्यावरुन धक्का देऊन केतनला संपवलं. दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री झाल्यानं गुन्हा घडला. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

''आधी तू मला फसवतोस अन् मग...''
सिया गोयलचा ७ महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यातून या प्रकरणात चौथी व्यक्ती असल्याचा संशय वाढला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ डिसेंबर २०२५ मधील आहे. त्यात सिया एका पबमध्ये दिसत आहे. तिच्या हातात बियरची बाटली आहे. ती मोबाईलवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात बोलताना दिसत आहे. पबमध्ये म्युझिक सुरू आहे. त्या आवाजात सिया मोबाईलवर जोरात बोलताना दिसते. 'आधी तू मला फसवलंस आणि मग मलाच कॉल करतोस,' असं सिया चढ्या आवाजात मोबाईलवर बोलते. सियाचे चेतनशी प्रेम संबंध होतं. पण फेब्रुवारीत तिन केतनशी साखरपुडा केला. मग डिसेंबर २०२५ ती तू मला फसवलंस, असं कोणाला म्हणत होती, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या दरम्यान सिया अर्वाच्च भाषेत शिव्या देताना दिसत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या सियाच्या वर्तनाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. याआधीही सिया गोयलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती चेतन चौधरी सोबत महाराष्ट्र क्रिकेट लीगचा सामना पाहताना दिसत आहे. चेतन आणि सियाचा तो व्हिडीओ समोर आल्यानं दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. त्याबद्दल वेगवेगळे कयास बांधले जाऊ लागले.

सियाचा पबमधील व्हिडीओ समोर आल्यानं तिच्या आईनं केलेला दावा खोटा ठरला आहे. माझी लेक कधीही पार्ट्यांना गेलेली नाही, ती कधीही दारु प्यायलेली नाही, तिनं धूम्रपान केलेलं नाही, असा दावा सियाची आई पूजा गोयल यांनी केला होता. पण पबमधील व्हिडीओ समोर आल्यानं पूजा गोयल तोंडावर पडल्या आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा गोयल यांनी सिया आणि चेतन यांच्या संबंधांबद्दलही भाष्य केलं होतं. 'चेतना आम्ही ओळखत होतो. पण आम्ही त्याला केवळ सियाचा मित्र म्हणून ओळखत होतो. सियाला चेतन नावाचा मित्र असल्याची केतनलाही कल्पना होती,' असं पूजा गोयल यांनी सांगितलं होतं. सिया आणि चेतन यांच्या फोटोंबद्दल विचारलं असता, ते दोघे एका मित्राच्या लग्नाला गेले होते, असं उत्तर पूजा गोयल यांनी दिलं. त्या दोघांचे प्रेम संबंध नव्हते. ते केवळ एका मित्राच्या विवाहाला सोबत गेले होते, असं पूजा यांनी सांगितलं होतं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims