Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune News: पुणे-सासवड मार्गावर 9 किमी लांब 'लिंक रोड', शहरात प्रवेश केल्याशिवाय थेट प्रवास शक्य होणार; कुठून-कुठे जोडणार?

Pune News: पुणे-सासवड मार्गावर 9 किमी लांब 'लिंक रोड', शहरात प्रवेश केल्याशिवाय थेट प्रवास शक्य होणार; कुठून-कुठे जोडणार?

पुणे: पुणे-सासवड मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी कोंढवा ते वडकी चौकापर्यंत 9 किमी लांब मार्ग उभारण्यात येणार आहे. कोंढवा येथील खादी मशीन चौकापासून हा मार्ग सुरू होत असून पुणे महापालिकेकडून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

दक्षिण पुण्यातील कोंडी फोडून रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

मार्गाची गरज का आहे?

या मार्गाची बांधकाम प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वप्रथम जमिनी सर्वेक्षण करून भौगोलिक मूल्यांकन आणि प्रस्तावित संरेखनाच्या बाजूला असलेल्या मालमत्तांचे तपशीलावर ऑडिट करण्यासाठी सल्लागार एजन्सी नियक्त करेल. पुण्यात नियमित प्रवाशांसाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचं रुंदीकरण फायेदशीर ठरणार असलं तरी, वाहतुकीच्या दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी सासवड किंवा सोलापूर रसत्याकडे जाण्यासाठी मार्ग विकसित करणं महत्त्वाचं आहे. या प्रस्तावित 9 किमी लांब मार्गामुळे अवजड आणि व्यावसायिक वाहनांसाठी बायपास म्हणून काम करणार आहे.


सध्या सातारा, सासवड आणि सोलापूर महामार्गांदरम्यान वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरातील अरूंद रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या नव्या मार्गामुळे वाहनांना शहरतील अंतर्गत वाहतूक कोंडीतून प्रवास न करता थेट प्रवास करणं शक्य होणार आहे. त्यामुळे शहारतील अंतर्गत हलक्या वाहनांची वाहतूक आणि शहराबाहेरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचं विभाजन होणार आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासह या नव्या मार्गामुळे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार आहे.

काम कधी सुरू होणार?

हा मार्ग Regional Planअंतर्गत या पूर्वीच प्रस्तावित होता. पण अनेक काळापासून मार्ग तयार करण्यात आला नव्हता. पण आता या प्रकल्पासाठी सध्या सविस्तर अहवाल तयार करून लवकरात लवकर हे काम पूर्ण कसं करता येईल याचं नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


काही महिन्यांपासून खादी मशीन चौक आणि कोंढवा परिसरातील मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अनेक वाहनाचालक बोपदेव घाटामार्गे सासवडपर्यंत जातात. त्यामुळे शहरातील मार्गांवर कोंडी वाढते. या मार्गांच्या क्षमतेनुसार ही वाढती वाहतुकीची समस्या हातळणं अशक्य असल्याची माहिती स्थानकांनी दिली आहे. त्यामुळे सोलापूर, सासवड आणि साताऱ्याला जोडणारे सर्व दुवे लवकरात लवकर विकसित करण्याची गरज असल्याचं त्यांनी मागणी केली आहे.

कात्रज-कोंढवा या सध्याच्या रस्त्यावरील जमीन मालकांना पुढील महिन्याभरात नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाईल, अशी पीएमसीची अपेक्षा आहे. दरम्यान, ज्या भागात आधीच नागरी संस्थेचा ताबा आहे, अशा भागात रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims