पुणे: पुण्यात बाह्य रिंग रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे. रिंग रोडच्या पश्चिमेकडील भागात अनेक भुयारी मार्ग आणि पूल आहेत. या भागावरील काम अधिक कठीण असलं तरी प्रगती दिसून येत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक आणि शहराबाहेरील वाहनांची वाहतूक विभागण्यासाठी या सहा पदरी मार्गाची योजना आखली आहे.
शहराच्या बाहेरून तयार केलेल्या या वर्तुळाकार मार्गामुळे नागरिकांचा पुण्यातील प्रवास सुखकर होणार आहे.
कसा होणार फायदा?
खडकवासला, मुळशी, चाकण, हिंजवडी, सिंहगड, उर्से, सोरतापवाडी आणि वाडेबोल्हाई या गावांमध्ये बांधकाम सुरू आहे. दरम्यान, सांगरूण आणि डावजे गावांमध्ये बोगद्यांचं काम सुरू आहे. या प्रकल्पातील चार मुख्य भागांवर काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.
या सहा पदरी महामार्गासाठी भोर तालुक्यातील रांजे गावात एक 1.5 किमी लांब पूल असेल. या व्हायाडक्टने रिंग रोडला जमिनीवर पोहचवून उन्नत करण्यात येईल. या मार्गावरी सर्वात लांब बोगद्याचं सिंहगड किल्ल्याशेजारी सुरू आहे. हा बोगदा 5.87 किलोमीटर लांब असून रिंग रोडच्या पश्चिम भागातील सर्वात महत्त्वपूर्ण मार्ग आहे. यामुळे खामगाव मावळ आणि कल्याण गावाजवळील 35 किलोमीटर लांब घाट मार्गाला पर्याय उपलब्ध होणार आहे. एक तासाचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत शक्य होणार आहे.
पश्चिम आराखड्यात 8 जुळे बोगदे, सात व्हायाडक्ट, 10 पूल, 26 ओव्हरपास आणि 9 पादचारी अंडरपासचा समावेश आहे. मुंबईहून पश्चिम महाराष्ट्र आणि बंगळुरू प्रवासात वेळ वाचण्याची शक्यता आहे. याशिवाय, खडकवासला धरणावरही एक 500 मीटर लांब पूलाचं काम सुरू आहे. तसेच, कल्याण गावाजवळही काम वेगाने सुरू आहे.
कोणत्या गावांमधून मार्ग?

