अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील अंदाजे 3 हजार गॅस सिलेंडर (काही भरलेले तर काही रिकामे) पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीत किंवा नदीकाठावर आढळणाऱ्या सिलेंडरना हात लावू नये, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
चावणे येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील एचपीसीएलच्या प्लॉट क्रमांक ई-१/७ मधून हे सिलेंडर पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. त्यामुळे पाताळगंगा नदीच्या काठावरील विविध गावांमध्ये हे सिलेंडर वाहून येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
धोकादायक ठरु शकतं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
सिलेंडर सापडल्यास जमा करण्याचे आवाहन
अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचं आवाहन
दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते पाहिल्यानंतर रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती किती भयानक आहे, याची प्रचिती येत आहे.

