मुंबई : राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कथित असंवेदनशील वर्तनावर आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मौनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहिले आहे.
'महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तडा जात असल्याची खंत व्यक्त करीत, तुमच्याकडून काही संकेतांची अपेक्षा आहे. मौन सोडा; अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील,' असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे राजकारण विचार, सुसंस्कृतपणा आणि राजकीय उमदेपणासाठी देशभर ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत ही परंपरा ढासळताना दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
संवेदनशीलतेबाबतच शंका
'तुमचे मंत्री सातत्याने बेताल विधाने करीत आहेत, काही नेते उघडपणे असंवेदनशीलता दाखवत आहेत; मात्र त्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काहीच बोलत नाही. तुमच्या मौनामुळेच ते अधिक बेफाम होत आहेत,' अशी टीकाही त्यांनी केली. 'देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, अशी महाराष्ट्राची आणि माझीही धारणा होती. मात्र, अशा घटनांवर तुमच्याकडून साधा खेदही व्यक्त होत नसल्याने त्या संवेदनशीलतेबाबतच शंका निर्माण होते,' असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक
महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वांत प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

