Dailyhunt
Raja Shivaji Box Office Report: बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी'सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स! तीन दिवसांत जमवला तब्बल इतक्या कोटींचा गल्ला

Raja Shivaji Box Office Report: बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी'सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स! तीन दिवसांत जमवला तब्बल इतक्या कोटींचा गल्ला

मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय.१ मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे.पहिल्या तीन दिवसांतच या सिनेमानं मराठी चित्रपटसृष्टीतील कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

राजा शिवाजी सिनेमाची तिसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई

पहिल्या दिवशी ११.३५ कोटींची दमदार ओपनिंग दिल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी कमाईत किंचितशी घट झाल्याचं दिसून आलं होतं. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं भारतात अंदाजे १२ कोटी रुपयांच्या जवळपास कमाई केली आहे.

तीन दिवसांचं एकूण कलेक्शन
'राजा शिवाजी'नं आपल्या पहिल्या वीकेंडपर्यंत एकूण ३७ कोटी रुपयांच्या जवळपास गल्ला जमवला आहे. रविवारच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सिनेमानं १३ कोटी १० लाख रुपयांची कमाई केली.

का ठरतोय ब्लॉकबस्टर?१ .
१०० कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेला हा मराठीतील आजवरचा सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे. रितेश देशमुखचा अभिनय, शिवरायांच्या इतिहासाची भव्य मांडणी आणि सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या विशेष भूमिकांमुळं हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर रांगा लावत आहेत.अवघ्या तीन दिवसांत 'राजा शिवाजी'नें 'सैराट' आणि 'वेड' सारख्या मोठ्या चित्रपटांचे सुरुवातीचे विक्रम मागे टाकले आहेत. आता या चित्रपटाची नजर ५० कोटींच्या टप्प्याकडे लागली आहे. तसंच हा सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अजय-अतुल यांचं संगीत आणि भव्यता .
चित्रपटाची गाणी आणि बॅकग्राउंड स्कोअर प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलं आहे. त्यांचं 'छत्रपती' हे अँथम गाणं आधीच सुपरहिट ठरलं आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी टिपलेली सह्याद्रीची दृश्ये आणि युद्धाचे प्रसंग चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

दोन वेगवेगळ्या आवृत्त्या
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांसाठी रितेशनं वेगवेगळे रनटाइम ठेवले आहेत. मराठी आवृत्ती सुमारे ३ तास १५ मिनिटांची असून, ती अधिक सविस्तर आहे, तर हिंदी आवृत्ती थोडी संक्षिप्त ठेवण्यात आली आहे.

पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये या चित्रपटाची क्रेझ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते, येणाऱ्या दिवसांत सिनेमाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims