मुंबई : पंधरावर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असला, तरी त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याला संधी मिळाली नाही.
मात्र, याच मुद्द्यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी केलेल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. वैभवला आयर्लंडमध्येच खेळवायला हवं होतं, असं सांगताना शास्त्रींनी केलेली एक कमेंट आता व्हायरल होत आहे. सोनी स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान शास्त्रींना वैभवला इंग्लंडविरुद्ध संधी द्यायला हवी का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्कील अंदाजात उत्तर दिलं.
"अरे, त्याला आयर्लंडमध्येच खेळवायला हवं होतं. तिथली मैदानं लहान आहेत. त्याने सहज स्टेडियमच्या छप्परावर चेंडू मारला असता. आयर्लंडची तर पॅन्ट काढून हातात दिली असती. आता इंग्लंडमध्ये त्याला खेळवतील की नाही, ते माहीत नाही," असं शास्त्री म्हणाले. दरम्यान, शास्त्रींनी वापरलेला 'पॅन्ट काढून हातात देणं' हे वाक्य शब्दशः अर्थाचे नसून प्रतिस्पर्धी संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवणं किंवा जबरदस्त धुलाई करणं, या अर्थाने वापरला जातो.
"आयपीएलमध्ये प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली"
"१५ वर्षांच्या मुलावर कसला दबाव?"
आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही प्रतीक्षा
दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही वैभवला संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला अखेर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे आता सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

