Dailyhunt
Reliance Crash: अनेकांची गरिबी गायब करणारा RIL शेअर तोंडावर आपटला, मिनिटांत 80000 कोटींना लागली आग

Reliance Crash: अनेकांची गरिबी गायब करणारा RIL शेअर तोंडावर आपटला, मिनिटांत 80000 कोटींना लागली आग

RIL Share Price: सोमवार, आठव्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, (6 एप्रिल 2026) शेअर बाजारातील दिग्गज आणि निर्देशांकातील हेवीवेट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सना घसरणीचे ग्रहण लागले आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीच्या दबावामुळे सोमवारी रिलायन्सचे शेअर्स 4% हून अधिक घसरले. या घसरणीमुळे केवळ मुकेश अंबानींच्या कंपनीच्या बाजार भांडवलालाच फटका बसला नाही, तर संपूर्ण निफ्टी50 निर्देशांकही खाली खेचला गेला.

रिलायन्स शेअरमध्ये विक्रीचा हाहा:कार
ट्रेडिंग सत्रादरम्यान RIL शेअर्स दहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले असून आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवसाच्या अवघ्या काही तासांतच कंपनीचे मार्केट कॅप 81000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमी झाले. या दरम्यान, देशांतर्गत बाजारावर सुधारणेचा रंग काढला तरीही रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 3.50% हून अधिक घसरणीसह ट्रेड करत असून सत्रादरम्यान ही घसरण 4.50% पर्यंत वाढलेली. तसेच RIL शेअर 52 आठवड्याच्या उच्चांकावरून 19 टक्क्यांहून अधिक घसरला असून गेल्या दोन आठवड्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 8% पेक्षा जास्त घसरण झाली.

रिलायन्स स्टॉकमधील घसरणीमुळे कंपनीचे बाजार मूल्य म्हणजे M-cap एका झटक्यात 18 लाख कोटी रुपयांवरून 17.65 कोटी रुपये राहिले. रिलायन्सच्या शेअरमधील या घसरणीमागे भू-राजकीय तणाव सर्वात मोठे कारण आहे.

मुकेश अंबानींच्या RIL शेअरमधील घसरणीचे कारण काय?

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जगातील तेल व्यापाराचा मोठा भाग होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करतो, अशा स्थितीत, या जलमार्गावरील सततच्या तणावामुळे तेलाच्या तुटवड्याची भीती वाढली असून रिलायन्सकडे एक मोठे तेल शुद्धीकरण केंद्र आहे. त्यामुळे, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील व्यत्ययांचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर होतो.

निर्यात शुल्कात वाढ
डिझेल आणि ATF च्या निर्यातीवरील सरकारच्या करामुळे रिलायन्सच्या समस्या आणखी वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारने डिझेलवर प्रति लिटर 21.50 रुपये आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावर प्रति लिटर 29.50 रुपये निर्यात शुल्क पुन्हा लागू केले. या निर्णयामुळे रिलायनन्ससारख्या स्वतंत्र रिफायनिंग कंपन्यांसाठी डिझेल आणि एटीएफमधील दरांचा फरक प्रति बॅरल 20 डॉलरपर्यंत मर्यादित राहण्याचा जेफरीजने म्हटले.

(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे. व्यक्त केलेली मते आणि शिफारसी वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकरेज कंपन्यांची आहेत, महाराष्ट्र टाइम्सची नाही. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घेण्याचे आम्ही आमच्या वाचकांना सल्ला देतो.)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims