मुंबई:बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा आज पुण्यतिथी. त्यांचे अनेक किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.ऋषी कूपर यांच्या सिनेमांची जितकी चर्चा झाली, तितकेच ते अनेकदा वादातही अडकले.
वादग्रस्त व्यक्तव्यांमुळंही ते बऱ्याचदा चर्चेत आले होते.इतकंच नाही तर त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी पुरस्कार विकत घेतला होता, हे खुद्द त्यांनी स्वत: जाहीर कुबलही केलेलं.तो किस्सा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय.
खरं तर बॉलिवूडमध्ये स्पर्धा आणि वाद काही नवीन नाहीत, पण जेव्हा एखादा दिग्गज अभिनेता स्वतःची चूक कबूल करतो,स्वत:बद्दल धक्कादायक खुलासा करतो तेव्हा ती मोठी बातमी ठरते. हिंदी चित्रपटसृष्टीतील 'चिंटू' म्हणजेच दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रात एका अशा घटनेचा खुलासा केला होता, ज्यामुळं खळबळ उडाली होती. १९७३ मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांना मागे टाकण्यासाठी चक्क सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विकत घेतल्याची कबुली दिली होती.
१९७३ हे वर्ष तसं बॉलिवूडसाठी महत्त्वाचं होतं. एका बाजूला ऋषी कपूर यांचा पदार्पणातला 'बॉबी' हा रोमँटिक चित्रपट सुपरहीट ठरला होता, तर दुसरीकडं सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा 'जंजीर' चित्रपट धुमाकूळ घालत होता. 'अँग्री यंग मॅन' म्हणून अमिताभ यांची ओळख निर्माण झाली होती.
फिल्मफेअर पुरस्कारांच्या शर्यतीत या दोघांमध्ये अटीतटीची लढत होती.तरी देखील हा पुरस्कार बिग बी अमिताभ यांनाच मिळणार अशी चर्चा रंगल्यानं त्यांचं पारडं जड होतं. पण हा पुरस्कार ऋषी कपूर यांना जाहीर झाला.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या 'खुल्लम खुल्ला' या पुस्तकात लिहिलं आहे की, मला लाज वाटतेय, पण मी तो पुरस्कार ३० हजार रुपयांना विकत घेतला होता. एका पीआर व्यक्तीनं मला सांगितलं होतं की, ३० हजार रुपये द्या आणि पुरस्कार मिळवा. मी त्यावेळी खूप लहान आणि अल्लड होतो, त्यामुळं मी विचार न करता पैसे दिलेही होते.
अमिताभ बच्चन यांची नाराजी
ऋषी कपूर यांना आयुष्यभर पश्चात्ताप
दरम्यान, यानंतर काही वर्षांनी दोघांमधील कटुता संपली आणि त्यांनी 'अमर अकबर अँथनी' ते '१०२ नॉट आऊट' पर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.

