Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Riyan Parag : राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन रियान परागला BCCI चा झटका, ई- सिगरेट ओढल्यामुळे बंदी नाही पण मॅच फी कापली

Riyan Parag : राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन रियान परागला BCCI चा झटका, ई- सिगरेट ओढल्यामुळे बंदी नाही पण मॅच फी कापली

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली होती. राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्ज मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये कॅप्टन रियान पराग याचा ई- सिगरेट (व्हॅपिंग) ओढताना दिसला होता.

रियान पराग याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं पाहायला मिळालं होतं, रियानवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. रियानने केलेल्या कृत्यावर बीसीसीआय काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच एक मोठी अपडेट समोर आली असून रियानला त्याने केलेल्या कृत्याचा बीसीसीआयने झटका दिला आहे.

बीसीसीआयकडून रियानला दंड

बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून आचार संहितांचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. या कृत्यामुळे रियान परागची २५ टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. त्यासोबतच एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. परागनेही त्याची चूक मान्य केली असून रेफरी अमित शर्मा यांनी त्याच्यावर लावलेला दंड त्याने मंजूर केला आहे. रियान पराग याच्यावर अखेर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली. जर त्याच्या या कृतीवर कोणतीही कडक पाउले उचलली नसती गेली तर एक चुकीचा संदेश गेला असता. व्हायरल व्हिडीओवर क्रीडा चाहत्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती.


पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू होती. हा सामना राजस्थान संघाने जिंकला, मात्र दुसऱ्या दिवशी कॅप्टन रियान पराग याचा ड्रेसिंग रूमधील ई सिगरेट ओढतानाचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला. आयपीएलसारख्या प्रतिष्ठित लीगमध्ये झालेल्या अशा प्रकारच्या कृत्याने सर्वांनीच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यामधील सहा सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. कर तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान संघाचे १२ गुण असून त्यांचा नेट रनरनेट +०.६१७ आहे.पॉइंट टेबलमध्य चौथ्या स्थानावर आहे. परंतु दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अससेल्या संघाचे गुण हे सारखेच आहेत. त्यामुळे अंतिम तीनसाठी मोठी रस्सीखेंच पाहायला मिळू शकते.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims