Dailyhunt
Rules Change from 1st May: UPI ट्रेडिंग, बँकिंग ते म्युच्युअल फंडापर्यंत... 1 मे पासून 10 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या पैशांवर हल्ला!

Rules Change from 1st May: UPI ट्रेडिंग, बँकिंग ते म्युच्युअल फंडापर्यंत... 1 मे पासून 10 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या पैशांवर हल्ला!

Changes From 1st May 2026: 1 मे ही केवळ नवीन महिन्याचीच नाही तर सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन नियमांची सुरुवातही आहे. आजपासून लागू होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या पैशावर होईल.

LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्यासोबतच सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित इतरही काही आर्थिक बदल झाले ज्यांच्याबद्दल प्रत्येकाला माहिती असली पाहिजे.


Financial Changes from 1st May: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमांमध्ये बदल होतात. 1 मे 2026 पासून देखील वित्तीय आणि गैर-वित्तीय सेवांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम देखील बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. तो कसा येथे जाणून घेऊया1 मे पासून कोणकोणते नियम बदलणार 1 मे पासून कोणकोणते नियम बदलणार" />

आर्थिक आघाडीवर आजपासून सर्वसामान्यांशी संबंधित पाच नियम बदलणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होईल. म्हणूनच, मे महिन्याच्या सुरुवातीला लागू होणारे नवीन नियम पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. क्रेडिट कार्ड धारकांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत सर्वांवर या नवीन नियमाचा परिणाम होईल. ऑनलाइन गेमसंबंधितही लक्षणीय बदल आजपासून लागू होणार आहेत.


एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल" />

1 मे रोजी सकाळसाकळी सरकारी तेल कंपन्या म्हणजे OMCs नी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केली आहे. 19-किलोचा व्यावसायिक गॅस 993 रुपयांनी महाग झाला असून कंपन्या सिलिंडर बुकिंगसाठीचा लॉक-इन कालावधी बदलण्याची शक्यता आहे.


एलपीजी गॅसचे नियम बदलले एलपीजी गॅसचे नियम बदलले" />

तेल कंपन्या 1 मे पासून नवीन नियम लागू करणार आहेत. गॅस बुकिंगशी संबंधित अनेक बदल अपेक्षित असून या नियमांनुसार ओटीपी-आधारित डिलिव्हरी अनिवार्य होईल आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक असणार आहे.


यूपीआय व्यवहार यूपीआय व्यवहार" />

डिजिटल व्यवहारांमधील वाढ आणि वाढत्या सायबर फसवणूकीला प्रस्तिसाद म्हणून मोठ्या यूपीआय व्यवहारांबाबत काही बदल करण्यात आले आहेत. 1 मे पासून मोठ्या UPI व्यवहारांसाठी अतिरिक्त फीचर्स जोडले गेले आहेत. यामध्ये व्हेरिफिकेशन प्रक्रियेचा समावेश आहे, ज्यामुळे पेमेंट करताना अतिरिक्त स्टेप आवश्यक असेल. म्हणेज यूपीआय वापरून मोठी रक्कम हस्तांतरित करणे अधिक त्रासदायक ठरू शकते.


एसबीआय क्रेडिट कार्ड एसबीआय क्रेडिट कार्ड" />

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, एसबीआयने, क्रेडिट कार्डवरील विलंब शुल्कात सुधारणा केली आहे. 1 मे पासून 100 ते 500 रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 100 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल, तर 500 ते 1000 रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेसाठी 500 रुपयांपर्यंत शुल्क वाढ केली गेली आहे. मात्र इतर सर्व शुल्क पूर्वीप्रमाणेच राहतील. तसेच बीपीसीएल एसबीआय क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्कातून सूट मिळवण्यासाठी 1 लाख रुपये खर्च मर्यादा वाढवली गेली आहे, जी आतापर्यंत 50000 रुपये होती.


ऑनलाइन गेमिंग ऑनलाइन गेमिंग" />

1 मे पासून ऑनलाइन गेमिंगसंदर्भात नवीन नियम लागू होत आहेत. या क्षेत्राचे नियमन आणि देखरेख करण्यासाठी सरकारने 'ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया'ची स्थापना केली गेली आहे. या क्षेत्राची ऑनलाइन मनी गेम्स, ऑनलाइन सोशल गेम्स आणि ई-स्पोर्ट्स अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी केली जाईल. ज्या खेळांमध्ये पैशांचे व्यवहार होतात, त्यांची नोंदणी करणे आवश्यक असेल आणि या व्यवहारांवर सरकारी संस्थेद्वारे देखरेख किंवा पाळत ठेवली जाईल.


एटीएम विड्रॉलवर शुल्क वाढ एटीएम विड्रॉलवर शुल्क वाढ" />

रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर बँकांनी एटीएम शुल्कातही वाढ केली. 1 मे पासून बहुतेक बँका एटीएम विड्रॉलवर आता जास्त शुल्क आकारू शकतात. प्रत्येक महिन्याला मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये प्रति व्यवहार 21 रुपयांवरून 23 रुपये शुल्क आकारले जाईल. बँकिंग नियमांनुसार मूळ बँकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा आणि दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.


एलपीजी सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले एलपीजी सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले" />

1 मे पासून एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरीमध्येही बदल होणार आहेत. एलपीजी सिलिंडरचा गैरवापर आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने ओटीपी-बसेड डिलिव्हरी सुरू केली जाईल ज्यामुळे ओटीपीशिवाय सिलेंडर वितरित केले जाणार नाहीत. प्रत्येक सिलेंडरवर लक्ष ठेवण्यासाठी एक ट्रॅकिंग प्रणाली देखील विकसित केली जात आहे. ही प्रणाली वापरण्यापूर्वी ग्राहकांना आधारद्वारे त्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे देखील आवश्यक असेल.


Indian stock markets shut today for Christmas, marking last trading holiday of 2025 " />

भांडवली बाजार नियामक सेबीच्या निर्देशानुसार, 1 मे पासून ट्रेडिंग खात्याची सुरक्षा वाढवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणखी कडक केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, बाजारातील व्यवहारांच्या सेटलमेंट वेळेत आणि म्युच्युअल फंडांच्या रिडम्प्शन नियमांमध्ये काही बदल दिसून येऊ शकतात.


विम्याचे हप्ते आपोआप वजा होणार विम्याचे हप्ते आपोआप वजा होणार" />

शासकीय विमा योजनांचे वार्षिक हप्ते आता थेट बँक खात्यातून वजा केले जातील. 1 मे पासून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी 436 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक 20 रुपये आपोआप वजा केले जातील.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims