Indian Rupee Crash: मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम केवळ ऊर्जा क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर एक अधिक सार्वजनिक पैलू देखील समोर आणला आहे. भारतीय रुपया जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने कमकुवत होत आहे.
मंगळवार, 5 मे 2026 रोजी अमेरिकन डॉलरसमोर भारतीय रुपाया पुन्हा एकदा नीचांकीवर घरंगळला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.3% घसरून 95.40 वर आला, जो डॉलरच्या तुलनेत रुपया 0.3% घसरून 95.40 वर आला. भारतीय चलन 95.33 पर्यंत घसरला होता आणि आदल्या दिवशी आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर स्थिरावलेला.
रुपयाची घसरण नवीन नीचांकावर
पश्चिम आशियातील तणाव अद्याप शांत होण्याची चिन्हे दिसत नाही, यामुळे यामुळे विशेषतः भारतासाठी धोका वाढला आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आयातीचा खर्च वाढण्याची शक्यता असून तेलाचा भाव सध्या प्रति बॅरल 113 डॉलर असून त्यात किंचित घट झालेली आहे. जागतिक तेल किमतींमधील वाढ आणि डॉलरची सततची मागणी रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे.रुपयाच्या घसरणीचे पडसाद
भारतीय रुपायाच्या घसरणीचे अनेक परिणाम होतात, जे सर्वसामान्य लोकांच्या खिशावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करतात. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यास भारताला कच्चे तेल, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या अनेक वस्तू आयात करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. परिणामी आयात खर्च वाढतो आणि परकीय देयके अधिक महागतात.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा भडका उडणाररुपयाच्या घसरणीमुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्न आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महाग होऊ शकतात. भारत अनेक जीवनावश्यक वस्तू परदेशातून आयात करतो त्यामुळे रुपया कमजोर झाल्यास या वस्तू खरेदी करण्याचा खर्च वाढतो.
घराचे बजेट बिघडणार
रुपयाच्या घसरणीचा दररोजच्या जीवनावर हळूहळू परिणाम होऊ शकतो. वाहतूक, भाजीपाला, किराणा सामान आणि जीवनावश्यक सेवांच्या किमती वाढायचा धोका आहे ज्याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होतो. परिणामी, मासिक खर्च वाढतो आणि बचतीवर दबाव येतो. ही परिस्थिती विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तणावपूर्ण असू शकते, कारण त्यांचे उत्पन्न तेच राहते, पण खर्च वाढतो.
घसरत्या रुपयाचा अर्थव्यवस्थेवर आघात .
घसरत्या चलनाचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही होतो. सर्वप्रथम तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे देशाचे आयात बिल वाढते. अशा परिस्थितीत, आयातीवरील खर्च वाढल्यास व्यापार तूट म्हणजे आयात आणि निर्यातीमधील फरक देखील वाढतो परिणामी आर्थिक दबाव वाढतो. याशिवाय, महागड्या आयातीमुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि कंपन्या तो अतिरिक्त खर्च ग्राहकांवर लादतात, परिणामी महागाईचा धोका निर्माण होतो. इतकेच नव्हे, कमकुवत रुपया अनेकदा परदेशी गुंतवणूकदारांना अस्थिरतेचा संकेत देतो, ज्यामुळे बाजारातून FII गुंतवणूक काढून घेतली जाऊ शकते आणि शेअर बाजारात चढ-उतार होऊ शकतात.

