सलमान खानने काहीही केले तरी ती गोष्ट लगेच व्हायरल होते आणि चर्चेत येते. बरेचदा त्याच्याकडून अशा काही गोष्टी होतात ज्यात त्याला एकही शब्द न उच्चारताही थेट चर्चेचा विषय बनता येते. सध्या सलमान खानचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, हा अभिनेता चेक्सचा शर्ट आणि काळ्या रंगाचा गॉगल आणि डेनिम परिधान करुन दिसत आहे. त्याच्या मनगटावर घड्याळ आहे. सर्व काही ठिक असले तरी तो गाडीतून उतरताच क्षणी सर्वांचे लक्ष त्याच्या शूजकडे गेले. जे फाटलेले होते.
फाटलेल्या शूजमागचे सत्य
शूजव्यतिरिक्त, अभिनेत्याची पँटही काहीशी वेगळी दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे शूज सलमान खानला काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी भेट म्हणून दिले होते. यापूर्वी टायगर 3 चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमान खान फाटलेले शूज घालून आला होता.
तेव्हाही त्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावेळी सलमानसोबत त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांनी स्पष्ट केले की, ते शूज प्रत्यक्षात फाटलेले नव्हते; उलट, ते एका आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडचे अत्यंत महागडे शूज होते. खरे तर, हे बूट 'डिस्ट्रेस्ड लूक' (distressed look) या कॅटेगरीचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या ब्रॅण्डच्या शूजची किंमत साधारण 1.20 लाख ते 1.50 लाख रुपये आहे.
आजच्या फॅशनच्या जगात, कपडे आणि बूट मुद्दाम फाटलेले किंवा मळलेले दिसतील अशा प्रकारे तयार करण्याचा एक ट्रेंड सर्वत्र दिसून येतो. विशेष म्हणजे, अशा फाटलेल्या किंवा मळलेल्या वस्तू/ कपड्यांसाठी अनेकदा लाखांच्या घरात किंमत मोजावी लागते. एका मुलाखतीदरम्यान सलमान खानचे सहकलाकार पलक तिवारी आणि जस्सी यांनी हा खुलासा केला होता की, सलमान खान केवळ आरामासाठी (comfort) फाटलेले शूज घालतो.
त्याच मुलाखतीत पलक तिवारीने म्हणालेली की सलमान खान मोठा स्टार असल्याने त्याच्याकडे अमाप पैसे आहेत. त्यामुळे तो कधी फाटलेले शूज घालूच शकत नाही असा लोकांचा त्याच्याबाबतीत समज झाला आहे.

