Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sangli Crime : पांढऱ्या द्रवाचा अंश अन् उग्र वास, पती-पत्नीचा एकामागून एक संशयास्पद मृत्यू, कदम कुटुंबावर शोककळा

Sangli Crime : पांढऱ्या द्रवाचा अंश अन् उग्र वास, पती-पत्नीचा एकामागून एक संशयास्पद मृत्यू, कदम कुटुंबावर शोककळा

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातील पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा सोमवारी आपल्या राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा उपचार सुरू असताना काल मंगळवारी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला.

याबाबत त्यांचा मुलगा अजय कदम यांनी माहिती दिली.

दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय असून, या दुहेरी मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी आयुष्य संपवल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलगा अजय कदम हा आई-वडिलांपासून वेगळा कागल येथे राहतो.

घरगुती वादाचा संशय

बाळासाहेब कदम व त्यांची पत्नी उषा हे दोघेच पलूस येथे राहत होते. ३० ऑगस्ट रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला असावा. यातूनच पत्नी उषा यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पत्नीची प्रकृती गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच, ३१ ऑगस्ट रोजी स्वतः बाळासाहेब कदम यांनीही विषारी औषध प्राशन केले.

पत्नीची प्रकृती बिघडताच पतीचं टोकाचं पाऊल

बाळासाहेब हे बेशुद्ध अवस्थेत असून, त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याची बाब त्यांचा मुलगा अजय कदम याच्या निदर्शनास आली. त्यांना तात्काळ नातेवाईकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, उषा कदम यांची प्रकृतीही गंभीर बनत चालली होती. हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

निर्णयामागील कारण अस्पष्ट

दोघांनी एकाच काळात विषारी औषध प्राशन करण्यामागे कौटुंबिक, आर्थिक, वैयक्तिक अथवा अन्य कोणते कारण होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. विशेष म्हणजे, बाळासाहेब कदम यांच्या मृत्यूच्या ठिकाणी आढळलेला पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तसेच उषा कदम यांनी विषारी औषध घेतल्याची नोंद यामुळे दोन्ही मृत्यूंचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

शवविच्छेदन अहवाल तसेच आवश्यक वैद्यकीय व पोलिस तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही मृत्यूंची नोंद पलूस पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, तपास पोलीस करीत आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims