Dailyhunt
सतत येणाऱ्या गे लोकांच्या मेसेजमुळे बिग बॉसच्या ऑफरकडे झालेलं दुर्लक्ष, Omkar Raut ने सांगितला एण्ट्रीचा किस्सा

सतत येणाऱ्या गे लोकांच्या मेसेजमुळे बिग बॉसच्या ऑफरकडे झालेलं दुर्लक्ष, Omkar Raut ने सांगितला एण्ट्रीचा किस्सा

बिग बॉस मराठी सीजन 6 आता शोच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करत आहे. या शो मधून बरेच स्पर्धक एलिमिनेट झाले आणि आता शेवटचे 7 जण उरले आहेत. त्यामुळे यंदाच्या शोचा विजेता किंवा विजेती कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.

यावेळी या सीझनमध्ये ओमकार राऊत हा स्पर्धक म्हणून आला होता. त्याने एका मुलाखतीमध्ये बिग बॉस मध्ये कसा आला याबाबत सांगितले.

असे बरेच ऍक्टर आणि इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांना बिग बॉस मध्ये यायचं आहे पण चान्स भेटत नाही किंवा काही ना काहीतरी होतं. पण बिग बॉस मध्ये जायला नशीब लागतं. माझं नशीब चांगलं होतं खरं तर. मला बिग बॉसची ऑफर येण्यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जेव्हा मला ऑफर आली होती. त्यांच्या टीम मधून मला खूप जण मेसेज वगैरे करत होते.

instagram वर मला बरेच गे लोकांचे मेसेज येतात. पोरांचेच भरपूर येतात. एका पॉईंट नंतर मी DM's बघणं बंद केलं. माझा असं झालं की मी आता बघणारच नाही. त्याच्यानंतर खूप मेसेज स्किप झाले. बिग बॉस कडून मला पंधरा-वीस दिवसांपासून मेसेज येत होते. पण मी DM's बघत नसल्यामुळे ते कनेक्ट होत नव्हते. मग त्यांनी माझ्या एका मित्राशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याला सांगितलं की ओंकारला आमचा मेसेज बघायला सांगा. मग मी तो मेसेज पाहिला. रात्री दोन वाजता आमचं डिस्कशन झालं. मग मी टीमला भेटलो, केतन सर प्रथमेश सरांना भेटलो. मला जो हा चान्स भेटतोय तोच माझ्यासाठी खूप होता त्यामुळे मी कुठल्याच कंडिशन्स घातल्या नाहीत. मला कोणत्याही परिस्थितीत बिग बॉस करायचं होतं कारण हा चान्स खूप कमी लोकांना भेटतो. सर्वकाही या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओमकार म्हणाला की मी स्वतःला लकी मानतो की मी बिग बॉस मध्ये गेलो.

ओमकार राऊत बद्दल बोलायचं झाल्यास जेव्हा त्याने बिग बॉस मध्ये एन्ट्री घेतलेली तेव्हा त्याच्या शरीर गोष्टीमुळे तो टास्क उत्तम खेळू शकेल असे अनेकांना वाटलेले. तसा तो खेळतही होता पण घरात जास्त वावर न दिसल्यामुळे त्याला खूप लवकर घराचा निरोप घ्यावा लागला. ओमकार राऊत चे रोशन दादांसोबतचे भांडण खूप गाजले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims