State Bank of India: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ATM व्यवहार शुल्कात सुधारणा केली, जी विशेषतः सॅलरी अकाउंटहोल्डर्सना लागू होईल.
तुमचे SBI मध्ये खाते असेल आणि इतर बँकांच्या एटीएममधून वारंवार विड्रॉल करत असाल तर 1 ऑक्टोबरपासून तुम्ही अधिक सावध राहिले पाहिजे.
एसबीआयने ATM विड्रॉलचे नियम बदलले
सध्या दरमहा 10 व्यवहार कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय करू शकतात पण 1 ऑक्टोबरपासून ही मर्यादा निम्म्याने कमी केली जाणार आहे. होय, सॅलरी पॅकेज खाती असलेल्यांसाठी इतर बँकांच्या एटीएममधून मोफत व्यवहारांची मर्यादा कमी करण्याचा निर्णय SBI ने घेतला आहे.10 ऐवजी आता 5 फ्री व्यवहार
एसबीआयच्या नवीन नियमांनुसार, दरमहिन्याला इतर बँकांच्या एटीएममधून विनामूल्य फक्त 5 व्यवहार करणे शक्य होईल आणि त्यात केवळ कॅश विड्रॉलच नव्हे तर एटीएम मशीनमधून शिल्लक तपासणे आणि मिनी स्टेटमेंट मिळवणे यांचाही समावेश असेल. म्हणजे दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वारंवार वापर केल्यास दरमहा विनामूल्य मर्यादा लवकरच संपू शकते.उदाहरणार्थ, तुम्ही दोनदा एसबीआय डेबिट कार्डद्वारे इतर बँकेच्या एटीएममधून विड्रॉल केले आणि दोनदा शिल्लक तपासली, तर चार व्यवहार पूर्ण मानले जातील. त्यानंतर, तुम्ही मिनी स्टेटमेंट काढल्यावर तुमच्या मोफत मर्यादेतून आणखी एक व्यवहार कमी होईल.
मोफत मर्यादा संपल्यास किती शुल्क भरावे लागेल?
अशा परिस्थितीत, महिन्याला पाच मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर इतर बँकांच्या एटीएममधून ट्रान्सक्शनवर शुल्क आकारले जाईल. याअंतर्गत कॅश विड्रॉलसाठी प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क आणि जीएसटी आकारले जाईल तर, बॅलन्स तपासणी किंवा मिनी-स्टेटमेंट यांसारख्या बिगर-आर्थिक कामांवर 11 रुपये शुल्क आणि जीएसटी आकारला जाईल. म्हणजे आता एसबीआयने अतिरिक्त व्यवहारांसाठी शुल्क वाढवलेले नाही, तर केवळ मोफत व्यवहारांच्या संख्येत बदलल्या आहेत.कोणत्या SBI ग्राहकांवर परिणाम होईल
तसेच लक्षात घ्या की हा बदल प्रत्येक एसबीआय खातेदारांना लागू होणार नाही, तर फक्त सॅलरी अकाउंटधारकांनाच लागू होईल. म्हणजे, तुमचे एसबीआयमध्ये नियमित बचत खाते किंवा इतर कोणतेही खाते असेल, तर या बदलाचा तुमच्यावर थेट परिणाम होणार नाही. अशा खात्यांसाठी मोफत एटीएम व्यवहार आणि सेवा शुल्कासंबंधीचे सध्याचे नियम लागू राहतील.तुम्ही एसबीआयचे एटीएम किंवा ADWM वापरत असाल, तर या बदलामुळे तुम्हाला अडचण होणार नाही. एसबीआयच्या स्वतःच्या एटीएमवर सॅलरी खाती असलेल्यांसाठी सध्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल नाही.
कार्डशिवाय विड्रॉलवर शुल्क
दुसरीकडे, एसबीआयने एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याबाबतही स्थिती स्पष्ट केली. या बदलामुळे कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि एसबीआय किंवा इतर बँकांच्या एटीएममधून कार्डशिवाय विड्रॉल विनामूल्य असेल. पण, बँकेने भविष्यात नवीन नियम जारी केल्यास या परिस्थितीत बदल होऊ शकतो.
