Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shrikant Shinde Accident : बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चार गाड्या एकमेकांना धडकल्या, खा. श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Shrikant Shinde Accident : बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चार गाड्या एकमेकांना धडकल्या, खा. श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

र्जुन राठोड, नांदेड : शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नांदेड दौऱ्यावर आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला.

ताफ्यासमोर अचानक दुचाकी आल्यानं चार गाड्या एकमेकांना आदळल्या. आज गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे. नायगाव येथील बैठकीला जात असताना हा अपघात घडला.



नेमकं काय घडलं?



खासदार श्रीकांत शिंदे हे राज्यभर शिवसंवाद दौरा करत आहेत. काल बुधवारी रात्री शिंदे यांचं नांदेडमध्ये आगमन झालं. यावेळी त्यांनी नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी नायगाव येथे बिलोली, देगलूर आणि मुखेड या तीन विधानसभा मतदार संघाची बैठकीचे आयोजन करण्यात आलं. या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी हे नायगावकडे रवाना झाले.

बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात अपघात

अण्णाभाऊ साठे चौकमार्गे त्यांचा ताफा जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर अचानक एक दुचाकी आली, त्यानंतर ताफ्यातील एका वाहन चालकानं वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावला. त्यानंतर पाठीमागील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातात एकवढा भीषण होता की चारही वाहनांचं मोठं नुकसान झालं. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये काही कार्यकर्ते आणि आरोग्य विभागातील काय कर्मचारी होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.

भरधाव ट्रॅक्टर अंगावर कोसळलं

अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यानं अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले. एका क्षणात दोन कुटुंबांचा आधार हिरावून नेणाऱ्या या घटनेनं सोनई व खरवंडी गावांवर शोककळा पसरली आहे.

नेमका कसा झाला अपघात?

सोनई येथील दत्तनगर परिसरातील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय 16) व विजय गणेश दरंदले (वय 14) यांना शाळेला सुट्टी लागल्यानं ते काल बुधवारी सकाळी खरवंडी येथे आपल्या मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते. दिवसभर आनंदात गेलेला हा क्षण सायंकाळी मात्र काळाने हिरावून घेतला. सायंकाळच्या सुमारास खरवंडी परिसरात ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यानं अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims