म. टा. प्रतिनिधी, जालना: 'जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युती होईल अथवा नाही याची चर्चा करू नका. सर्व ठिकाणी सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा. कमिट्यांवर नियुक्त्या नाहीत, आमच्या भागात मंत्री, आमदार, खासदार नाहीत, या तक्रारीत काही अर्थ नाही.
लोकांचे प्रश्न आणि समस्या असतील; तर त्या सोडविण्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, तीच खरी राजकीय पक्षाची ताकद असते,' असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. ते शिवसंवाद दौऱ्यात बोलत होते.
'एका अत्यंत सामान्य घरातील महिला कार्यकर्त्याला थेट राज्यसभेत जाण्याची संधी शिवसेनाच देऊ शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी संधी येण्याची शक्यता शिवसेनेतच असल्याचे,' डॉ. शिंदे म्हणाले.
'जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढू आणि आम्ही संपूर्ण मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात भगवा फडकवू,' असे खासदार संदीपान भुमरे म्हणाले.
'जालना जिल्ह्यात शिवसेनेत सर्वाधिक एकता आहे. कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याने निवडणुका जिंकण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत,' असे आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम केले
'मनोज पाटील जरांगे यांच्या बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकार सकारात्मक आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. जरांगे यांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देण्याचे काम सरकारने आतापर्यंत केले असून, यापुढेही करेल,' असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना शिंदे गटात धडधड
नाशिकच्या जागेवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना चांदवडमधून भाजपचे नेते भूषण कासलीवाल यांनीही विधान परिषदेसाठी अर्ज घेतला आहे. कासलीवाल यांनी थेट गुजरात 'कनेक्शन' वापरले आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही नाशिकचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरची जागा मिळाल्यास भाजपला नाशिकची जागा मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात धडधड वाढली आहे.

