Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Simhastha Kumbh Mela : 1 हजार 230 कोटींचा निधी, 'डेडलाइन' पाळण्यासाठी खालच्या पातळीचं काम; कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या रस्तेकामांचं धक्कादायक वास्तव समोर

Simhastha Kumbh Mela : 1 हजार 230 कोटींचा निधी, 'डेडलाइन' पाळण्यासाठी खालच्या पातळीचं काम; कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या रस्तेकामांचं धक्कादायक वास्तव समोर

.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्लपर्यंत सुरु असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान वेद मंदिराजवळ २५ मीटरपर्यंत तडे गेल्याचे समोर आले आहे. खुद्द पालिका आयुक्च मनीषा खत्री यांनी तपासणी केल्यानंतर ठेकेदाराला दणका देत निकृष्ट कामाप्रकरणी प्रतिदिन एक लाख ८४ हजारंचा दंड ठोठावला आहे.

बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात १,२३० कोटी रुपये खर्चून सुरु असलेल्या २८ रस्तेकामांच्या तपासणीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत असतानाही ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे उघड झाले आहे. रस्तेकामात अनियमितता आढळून आल्यानंतर बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतरही ठेकेदार पालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील १,२३० कोटी रुपये खर्चून २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत या रस्तेकामांवर नियंत्रण ठेवले जात आहे. विहित कालावधीत ही कामे पूर्ण होण्यासाठी कामांचे टप्पे ठरवून देण्यात आले असून, त्यानुसार कामांची प्रगती तपासली जात आहे.

कामांची 'डेडलाइन' पाळण्यासाठी गुणवत्तेत तडजोड

त्रयस्थ संस्थेमार्फतही या कामांचा दर्जा तपासला जात आहे. कामांची 'डेडलाइन' पाळण्यासाठी ठेकेदारांनी गुणवत्तेत तडजोड केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक रस्तेकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यासह घाईघाईत काम केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात आयुक्त मनीषा खत्री यांनी याबाबतची तपासणी केल्यानंतर बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानंतरही ठेकेदारांच्या कामात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. त्र्यंबकरोडवर खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नलपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. हे काम मेसर्स अजमेरा या ठेकेदाराला देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात डक्टच्या निकृष्ट कामाप्रकरणी याच ठेकेदाराला ५० हजारांचा दंड ठोठावला होता.

नव्या रस्त्यालाच पडले तडे

बॉश सर्कल परिसरातील वेद मंदिरासमोर सुरु असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात गुणवत्तेच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी काँक्रीटच्या काही पॅनलमध्ये मानकांपेक्षा अधिक तडे (क्रॅक्स) आढळून आले. कामाची गुणवत्ता अपेक्षित निकषांनुसार नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित भाग काढून टाकण्याचे, तसेच नवीन करण्याचे आदेश देतानाच कामातील त्रुटींची दखल घेत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ठेकेदाराला नोटीस बजावत प्रतिदिन एक लाख ७४ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

धक्कादायक वास्तव समोर

२५ मीटरपर्यंत काँक्रीट रस्त्यास तडे गेल्याचे समोर

१,२३० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
२८ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात सुरु

१,८४,००० रुपये प्रतिदिन ठेकेदारास ठोठावला दंड

१२ ठेकेदारांवर यापूर्वीच झाली आहे कारवाई
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims