मुंबई - आदित्य धरच्या 'धुरंधर' आणि 'धुरंधर २' या सिनेमांवर अनेकांनी टीका केली. प्रकाश राज यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी आणि चित्रपट समीक्षकांनीही 'धुरंधर'ला प्रचार करणारा चित्रपट म्हटलं.
मात्र, आता एका पाकिस्तानचे महापौर यांनीदावा केला आहे की, 'धुरंधर'मध्ये चित्रित केलेल्या सर्व घटना पूर्णपणे सत्य आहेत आणि त्या घटनांचे ते स्वतः साक्षीदार आहेत.
कराचीच्या माजी महापौरांचा दावा
'मी स्वतःला भारतीय वंशाचा मानतो'
दरम्यान, 'धुरंधर' आणि 'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंगने जसकिरत सिंग रंगीची भूमिका साकारली होती. तो हमजा अली मजारी असल्याचं भासवून पाकिस्तानात एक भारतीय गुप्तहेर म्हणून जातो. तिथं तो दहशतवाद्यांचे प्लॅन उघडकीस आणून ते उद्ध्वस्त करतो. 'धुरंधर'मध्ये १९९९ सालचं कंदाहार विमान अपहरण, भारतीय संसदेवरील हल्ला आणि २६/११ मुंबई हल्ले यांसारख्या सत्य घटनांचं चित्रण करण्यात आलंय. 'धुरंधर २' जसकिरत रंगीच्या भूतकाळ दाखवण्यात आला आहे. 'धुरंधर २' मध्ये आदित्य धरने काही तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडली असं म्हटलं जात होतं, परंतु आता पाकिस्तानचे माजी महापौर आरिफ अझाकिया यांनी स्वतः दावा केला आहे की 'धुरंधर'मध्ये चित्रित केलेलं सर्व काही सत्य होतं.

