मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंका अंडर-१९ क्रिकेट संघातील दोन खेळाडूंनी मिळून हॉटेलमधील महिलांचे व्हिडीओ काढल्याचं धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी त्यांनी अटक केली होती त्यांना आता सोडण्यात आले असून श्रीलंकन ५ लाख रूपये भरून त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
ही घटना कोलंबोमधील नाराहेनपीटा येथे घडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिस आता या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. आरोपींनी शुट केलेले व्हिडीओ कुठे अपलोड तर केले नाहीत ना? इतर कुठे शेयर नाही ना केले याचाही शोध घेत आहेत. जामिनावर बाहेर आलेल्या दोन्ही खेळाडूंची पुढील सुनावणी २५ मे रोजी होणा आहे.
श्रालंका क्रिकेटसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाची अवस्थ खराब आहे. कारण आताच मागे त्यांच्या प्रमुखांसह महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे बोर्डाच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. बोर्डाचे आणि काही खेळाडूंसोबत मतभेद आहेत. त्यामुळे खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी देण्यास अडथळा आणला, त्यामुळे बोर्डाकडून हे प्रश्न कसे सोडवले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्येही ऑस्ट्रेलियामध्ये श्रीलंकन खेळाडूवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये बोर्ड कोण कशी भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

