Dailyhunt
Subashini Balasubramaniyam : सन टीव्हीवरील अभिनेत्रीने आयुष्य संपवलं, व्हिडिओ कॉलवर पतीशी भांडणानंतर टोकाचं पाऊल

Subashini Balasubramaniyam : सन टीव्हीवरील अभिनेत्रीने आयुष्य संपवलं, व्हिडिओ कॉलवर पतीशी भांडणानंतर टोकाचं पाऊल

Tamil TV Actress Death : सन टीव्हीवरील 'कयल' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुभाषिनी हिने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत व्हिडिओ कॉलवर झालेल्या भांडणानंतर तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

अभिनेत्री सुभाषिनीचं टोकाचं पाऊल

सन टीव्हीवरील 'कयल' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुभाषिनी ही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत व्हिडिओ कॉलवर झालेल्या भांडणानंतर तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.


मूळ श्रीलंकेची सध्या चेन्नईत

सुभाषिनी चेन्नईच्या अय्यप्पंथंगल भागातील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये राहत होती. मूळची श्रीलंकेची असलेली सुभाषिनी यापूर्वी पती बिबिन याच्यासोबत बंगळुरुमध्ये वास्तव्य करत होती, परंतु मालिकेच्या शूटिंगमुळे ती सध्या चेन्नईतील पोरुर येथे राहत होती.


पतीशी व्हिडिओ कॉलवर वाद

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या सुभाषिनीचं रविवारी रात्री आपल्या पतीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं झालं. या संभाषणादरम्यान कौटुंबिक बाबींवरुन या दाम्पत्यामध्ये वाद झाला. त्यानंतर मानसिक त्रासातून तिने आयुष्य संपवल्याची चर्चा आहे


मानसिक तणावातून जीव दिल्याचा अंदाज

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुभाषिनीची बॉडी ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून सुभाषिनीने जीवनयात्रा संपवल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.


लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका

सुभाषिनीने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे मनोरंजन सृष्टीतही खळबळ उडाली आहे. 'कयल' ही मालिका अत्यंत लोकप्रिय असून पी. सेल्वम यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत, चैत्रा रेड्डी आणि संजीव कार्तिक यांच्यासह अभिनेत्री सुभाषिनीने एका महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.


अभिनय क्षेत्रात नाव

सुभाषिनीच्या फेसबुक प्रोफाइलनुसार, अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्यापूर्वी तिने अनेक टीव्ही शो आणि इव्हेंटचे सूत्रसंचालन केले होते. तिने श्रीलंका पर्यटन मंत्रालयासाठी प्रमोटर म्हणूनही काम केले. याव्यतिरिक्त तिने 'वसंतम टीव्ही'साठीही सूत्रसंचालन केले.


श्रीलंकेत कारकीर्द सुरु

सुभाषिनीने श्रीलंकेची वाहिनी 'नेत्रा टीव्ही' (Nethra TV) साठी निवेदिका म्हणूनही काम केले. या वाहिनीचे संचालन 'श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन'द्वारे केले जाते. तिने कोलंबो येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ द व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स'मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी ती बंगळुरु येथे वास्तव्यास होती.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims