Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Success Story : 13व्या वर्षी सेल्समन, ना कोणते कर्ज, ना कोणत्याही गुंतवणूकदाराची मदत; 10 हजाराच्या उधारीच्या पैशांतून उभारला कोट्यवधींचा ब्रँड

Success Story : 13व्या वर्षी सेल्समन, ना कोणते कर्ज, ना कोणत्याही गुंतवणूकदाराची मदत; 10 हजाराच्या उधारीच्या पैशांतून उभारला कोट्यवधींचा ब्रँड

Ravi Modi Success Story : वेदांत फॅशन्सची स्थापना करून रवी मोदींनी भारतीय फॅशन उद्योगातील यशस्वी साम्राज्य उभारले. एकेकाळी सेल्समन म्हणून सुरुवात करून आपल्या आईकडून 10,000 रुपये उसने घेऊन एक छोटा व्यवसाय थाटला, ज्याचे आज मूल्यांकन 9700 कोटी रुपये झाले आहे.

यासह रवी मोदी जगातील गडगंज श्रीमंतांपैकी बनले आहेत.


Who is Ravi Modi: औद्योगिक क्षेत्रातील यशोगाथा अनेकदा प्रसिद्धीझोतापासून दूर गुपचूप बनतात आणि रवी मोदी यांचा प्रवास नेमका याच कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.कौटुंबिक दुकानातून अत्यंत छोटी सुरुवात करून भारतातील एथनिक वेअर क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ब्रँड्सपैकी असा ब्रँड उभा करण्यापर्यंत मोदींचा प्रवास चिकाटी, विचारपूर्वक घेतलेले धोके आणि भारतीय ग्राहकांची अचूक समज यांचे प्रतिबिंब आहे.आपला व्यवसाय सुरू केला आपला व्यवसाय सुरू केला" />

2002 मध्ये वेदांत फॅशन्सची स्थापना करून रवी मोदींनी भारतीय फॅशन उद्योगात यशस्वी साम्राज्य उभे केले. कोलकातास्थित वेदांत फॅशन्स, मान्यावर, मोहे आणि मंथन यांसारख्या अनेक ब्रँड्सच्या माध्यमातून विक्री करते. मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली कंपनीने प्रचंड वाढ अनुभवली, ज्याचे उदाहरण 2022 मधील यशस्वी आयपीओ आहे. सूचीबद्ध कंपनीचे बाजार भांडवल आज 10,000 कोटी रुपयांवर पोहोचले असून यामुळे मोदींना भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये स्थान मिळाले.


सेल्समन म्हणून केलेले काम सेल्समन म्हणून केलेले काम" />

रवी मोदींनी अगदी साध्या पद्धतीने आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला. अवघ्या 13 व्या वर्षी रवी मोडीन कोलकाता येथील वडिलांच्या लहानशा (140 चौरस फूट) कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करू लागलेले. 1990 च्या दशकाच्या मध्यात किशोरवयीन रवी मोदींनी कौटुंबिक कपड्यांच्या दुकानात मेहनतीने काम करून विक्री आणि किरकोळ व्यवसायाचा मौल्यवान अनुभव मिळवला.


वडिलांनी नाकारला मुलाचा सल्ला वडिलांनी नाकारला मुलाचा सल्ला" />

त्यावेळी, त्यांच्या दुकानात प्रामुख्याने जीन्स, टी-शर्ट, पॅन्ट आणि शॉर्ट्स यांसारखे आधुनिक पुरुषांचे कपडे विकले जायचे पण, पारंपरिक भारतीय कपडे फार कमी होते. पुरुषांचे कुर्ते आणि पायजमे देखील दुकानात ठेवावे अशी रवीने वारंवार विनंती करूनही वडील बदल करण्यास तयार नव्हते.


आपली कल्पना प्रत्यक्षात आणली आपली कल्पना प्रत्यक्षात आणली" />

रवी 19 वर्षांचे असताना वडील तीर्थयात्रेला गेलेले. त्यावेळी, त्यांनी आपली कल्पना आजमावून पहिली पुरुषांच्या कुर्ता-पायजमाचे 100 सेट मागवून एका आठवड्यात त्यापैकी 80 विकले, यावरून त्याला पारंपरिक कपड्यांना असलेल्या प्रचंड मागणीची लक्षात आली. मग रवी मोदींनी वयाच्या 22 व्या वर्षी दुकान सांभाळणे सुरू केले आणि भारतीय पारंपरिक कपड्यांची विक्री सुरू करून उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवले.


आईकडून 10000 रुपये उसने घेतले आईकडून 10000 रुपये उसने घेतले" />

भारतीय संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देणारा ब्रँड सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकत रवी मोदींनी वेदांत फॅशन्सचा पाया घातला. आपल्या आईकडून केवळ 10,000 रुपये कर्ज घेऊन त्यांनी अशा उद्योगात मोठी भरारी घेतली, भारतीय फॅशन उद्योगात क्रांती घडवली.आज, वेदांत फॅशन्सची भारतातील 248 शहरांमध्ये 662 दुकाने आणि 16 आंतरराष्ट्रीय आऊटलेट्स असून कंपनीचे सध्याचे मूल्यांकन 9700 कोटी रुपये आहे.


यशोभरारी पण प्रसिध्दीझोतापासून दूर यशोभरारी पण प्रसिध्दीझोतापासून दूर" />

मान्यवरच्या देश-विदेशातील प्रसिद्धीने रवी मोदींना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आणि 2022 मध्ये फोर्ब्सने जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांची एकूण संपत्ती 2.5 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे नमूद केले. तसेच फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत रवी मोदींची एकूण संपत्ती अंदाजे 1.7 अब्ज डॉलर्स इतकी असली तरीही मोदी अत्यंत खाजगी आयुष्य जगणे पसंत करतात. प्रसारमाध्यमांसमोर वारंवार येणे टाळतात आणि NSE वर आपल्या कंपनीच्या लिस्टिंग समारंभालाही उपस्थिती लावली नव्हती.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims