Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sunil Gavskar : 'कसोटीमध्ये क्रिकेटमध्ये नो बॉलला फ्री हिट नकोच, मला तर वाटतंय की...'; सुनील गावसकरांनी सुचवला खतरनाक पर्याय

Sunil Gavskar : 'कसोटीमध्ये क्रिकेटमध्ये नो बॉलला फ्री हिट नकोच, मला तर वाटतंय की...'; सुनील गावसकरांनी सुचवला खतरनाक पर्याय

मुंबई : भारत आणि श्रीलंका कसोटीमध्ये रविंद्र जडेजाचे नो बॉल चर्चेत आहेत. जड्डूसोबत दुसऱ्याही स्पिनर्सनीही नो बॉल टाकले होते. एक नो-बॉलमुळे संपूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी कसोटीमध्येही आता फ्री हिट असावी अशी मागणी केली आहे.

पण कसोटी मालिका संपल्यावर यावर भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी वेगळाच पर्याय सुचवला आहे. गावसकर नेमका कोणता पर्याय सुचवला आणि फ्री हिट का नको हेसुद्धा सांगितले.

कसोटी क्रिकेटमध्ये फ्री हिटचा नियम आणल्यास फलंदाजांसाठी धावा करणं आणखी सोपं होईल. त्यामुळे हा उपाय फारसा योग्य वाटत नाही. आधीच एका ओव्हरमध्ये बाउन्सरची संख्या दोनपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे फलंदाजांना धावा करणं सोपं झालं आहे. त्याऐवजी नो-बॉलची चूक वारंवार करणाऱ्या गोलंदाजावर आर्थिक दंड वाढवण्याचा पर्याय अधिक प्रभावी ठरू शकतो. प्रत्येक वेळी चूक पुन्हा झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट करावी आणि त्यातील निम्मी रक्कम संबंधित बॉलिंग कोचकडूनही वसूल करावी, असा पर्याय विचारात घेता येऊ शकतो. जमा झालेल्या दंडाच्या पैशांचा उपयोग दौरा संपल्यानंतर खेळाडूंच्या वेगळं होण्यापूर्वी होणाऱ्या टीम डिनरसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंवर शिस्तीचा दबावही राहील आणि टीम बॉन्डिंगसाठी त्याचा उपयोगही होईल, असं मिश्किलपणे म्हणत सुनील गावसकरांनी हा पर्याय सुचवला आहे.

दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये रवींद्र जडेजाकडून अनेकदा नो-बॉल टाकण्यात आले. २०२१पासून आतापर्यंत या अनुभवी स्पिनरने तब्बल ८५ नो-बॉल टाकले आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची ही समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोलंबो टेस्टमध्ये पदार्पण करणारा सारांश जैनही नो-बॉलच्या बाबतीत मागे राहिला नाही. त्याच्याकडूनही वारंवार नो-बॉल पाहायला मिळाले. आपल्या करियरच्या पदार्पण सामन्याच पहिलाच बॉल नो-बॉल फेकला आहे.

दरम्यान, भारतीय टीमचे स्पिन बॉलिंग कोच साईराज बहुतुले यांनी यावर एक वेगळाच उपाय सुचवला. बुधवारी त्यांनी कसोटी क्रिकेटमध्येही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटप्रमाणे नो-बॉलनंतर फ्री हिट देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या विधानानंतर क्रिकेटविश्वात नो बॉलची चर्चा झाली. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये वन डे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये नो-बॉलनंतर फ्री हिट असते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims