Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Swara Bhaskar Clarification : मी राणी पद्मावतीला काही बोललेच नाही, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ! जौहर वादावर स्वरा भास्करची सारवासारव

Swara Bhaskar Clarification : मी राणी पद्मावतीला काही बोललेच नाही, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ! जौहर वादावर स्वरा भास्करची सारवासारव

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान संजय लीला भन्साळींच्या दीपिका पादुकोण फेम 'पद्मावत' चित्रपटातील 'जौहर' सीनबाबत केलेल्या विधानामुळे बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करला टीकेचा सामना करावा लागत आहे.

या कार्यक्रमात तिने 2018 मध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना लिहिलेल्या खुल्या पत्राचा संदर्भही तिने दिला. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि नंतर अभिनेत्रीवर टीकेची झोड उठली. मात्र, स्वराचे म्हणणे आहे की तिची विधाने चुकीच्या अनुवादासह प्रसारित केली जात आहेत; तिने ठामपणे सांगितले आहे की, तिने राणी पद्मावती किंवा स्त्रियांबद्दल कधीही काहीही आक्षेपार्ह म्हटलेले नाही.

स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय की, "काल मी एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, त्यातील माझी एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'पद्मावत' चित्रपटाबाबत मी संजय लीला भन्साळी यांना खुले पत्र का लिहिले होते, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. माझ्या उत्तरादरम्यान माझी भूमिका स्पष्ट करताना मी असे काहीतरी बोलले होते, ज्याचा आता पूर्णपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे आणि चुकीच्या स्वरूपात पसरवले जात आहे. विशेषतः राणी पद्मावती आणि 'जौहर' करणाऱ्या इतर स्त्रियांना मी 'भित्र्या' म्हटले, असा दावा केला जात आहे. मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की, मी कधीही राणी पद्मावती यांना भित्र्या म्हटले नाही, तसेच 'जौहर' करणाऱ्या इतर स्त्रियांना म्हणजेच राण्या आणि राजवाड्यातील स्त्रियांना सुद्धा मी भित्रे म्हटले नाही."

खोट्या गोष्टी रचून व्हायरल केल्या जात आहेत.

अभिनेत्री पुढे म्हणाली, "मी काय म्हणाले?.. मी ते इंग्रजीत म्हणाले होते. मी स्वतःच त्याचे भाषांतर करते, कारण जेव्हा भाषा समजत नाही, तेव्हा विचारून किंवा पडताळून पाहिले पाहिजे. कोणीही खोट्या गोष्टी रचून पसरवू नयेत किंवा लोकांना उगीच भडकवू नये. ज्यांना माझ्यावर शिवीगाळ करायची आहे त्यांनी खुशास करा, पण योग्य विषयावर करा."

स्वरा भास्करचा व्हिडिओ

स्वरा त्या विधानाबद्दल काय म्हणाली?

एका कार्यक्रमात केलेल्या विधानाबाबत बोलताना स्वरा भास्कर स्पष्टीकरण दिले की, "मी म्हटलेलं, चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना मला वाटलं की देव न करो पण जर मी कधी अत्याचाराची बळी ठरले असते तर स्वतःचा जीव न दिल्याबद्दल मला भित्री समजलं असतं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, अत्याचाराच्या घटनेतून वाचल्यामुळे मी भित्री ठरले असते, असं मला वाटलं. मी असं का म्हणाले? आपला समाज असा आहे जिथे अत्याचार मोठ्या प्रमाणावर, एखाद्या महामारीसारखे पसरले आहेत. आपण अशा वातावरणात जगतोय जिथे आपण अशा वातावरणात जगतोय जिथे अत्याचारी वृत्ती फोफावत आहे. अगदी कालच दिल्लीत सामूहिक अत्याचाराची एक अत्यंत क्रूर आणि हिंसक घटना घडली, जिथे एका तरुणीवर गाडीतच आत 46 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान सामूहिक अत्याचार करण्यात आला. हेच आपल्या देशाचे वास्तव आहे."

स्वरा भास्करचा प्रश्न

ती पुढे म्हणाली, "आपण असे चित्रपट बनवले पाहिजेत का, ज्यातून संदेश मिळतो की स्त्रीच्या शरीराची पवित्रता ही तिच्या आयुष्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे? आपण अत्याचारातून वाचलेल्या महिलांना संदेश दिला पाहिजे का की, त्यांनी जीव गमावला असता तर बरं झालं असतं किंवा त्यांनी जिवंत राहणं ही वाईट गोष्ट आहे? स्त्रीच्या आयुष्याचा शेवट अत्याचारानेच व्हावा का? हाच माझा प्रश्न आहे."

व्हिडिओच्या शेवटी स्वराने म्हटले आहे की, "निर्भया या धाडसी तरुणीला कधीही विसरू नका तिने आपल्यावर अत्याचार करणाऱ्या त्या सहा नराधमांविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. तिच्यात जगण्याची प्रचंड जिद्द होती. त्या सहा पुरुषांनी तिच्यावर अत्यंत क्रूर अत्याचार केले आणि अमानवीय क्रूरता गाजवली. त्या बिचाऱ्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला, पण तिने शेवटपर्यंत लढा दिला. त्यामुळे, स्त्रियांची जगण्याची इच्छा आणि जिद्द यांना कधीही कमी लेखू नका."
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims