ठरलं तर मग मालिकेच्या 1 May 2026 च्या एपिसोडमध्ये गिरीजा आणि नुपूर दोघी मिळून प्रियाची एक एक कारस्थान उघड करतात जी ऐकून सर्व सुभेदारांना धक्का बसतो. पुर्णा आजी आणि सायलीवरील जीवघेणा हल्ला या गोष्टींनंतर त्या दोघी अस्मितावरील हल्ला सुद्धा उघड करतात.
अस्मिताच्या चोरओटीवेळी प्रियानेच तेल सांडून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला. नुपूरने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रियानेच ती कबुली दिलेली असते. आपल्या बाळाच्या आणि आपल्यासुद्धा जीवावर प्रिया उठलेली हे समजताच अस्मिता सुद्धा भयंकर चिडते. ती मुद्दाम विमलला वाटीतून तेल आणायला सांगते. ते ती जमिनीवर सांडते आणि त्यावरुन प्रियाला चालायला सांगते. प्रिया तसं करायला नकार देते पण अस्मिता काही तिचं ऐकून घेत नाही. प्रियाला नाईलाजाने त्यावरुन चालायला लागतं. तेव्हा ती धापकन पडते. प्रिया स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असते पण तिचं कोणीच ऐकून घेत नाही. अश्विन तर कुबल करतो की हिच्याशी लग्न करुन सर्वात मोठी चुक झाली. पुढे हिला कोणीही माफ करेल पण मी मरेपर्यंत तिला माफ करणार नाही.
त्यानंतर कल्पना तिला फरफटत स्टोअर रुममध्ये घेऊन जाते आणि तिला तिथेच राहण्याची शिक्षा देते. प्रिया घरावरच्या हक्काची भाषा करते तेव्हा अर्जुन तिला कायद्याची भाषा ऐकवून शांत करतो. अस्मिता तर तिला घराबाहेर काढायचं म्हणत असते पण कल्पना मात्र तिला स्टोअर रुममध्ये राहण्याची शिक्षा करते. सगळे बाहेर निघून जातात. सायली तिच्या मैत्रिणी गिरीजा आणि नुपूरचे आभार मानते. त्या दोघी सुद्धा सायली अर्जुनला जेव्हा लागेल तेव्हा मदत करु अशी हमी देतात. तर आतमध्ये प्रिया बाहेर कसं पडायचं यावर विचार करत असते. घरेचे तिचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतात. अशा वेळी तिला प्रतिमाची आठवण येते. प्रतिमा तिला अजुनही मुलगी मानते. शिवाय सुभेदारांच्या घरात तिचा शब्द कोणीही डावलत नाही. त्यामुळे ती तिचा वापर करायचा ठरवते.
प्रिया प्रतिमाला फोन करते आणि तिच्याशी गोड बोलून तिला घोळात घेण्याचा प्रयत्न करते. तन्वी अचानक एवढी कशी सुधारली हे प्रतिमाला समजत नसतं. सुमन तिला सांगते की तुम्ही आता जास्त विचार करू नका, तन्वी जर स्वतःहून एक पाऊल पुढे टाकत असेल तर तुम्ही सुद्धा सकारात्मक विचार करा. मात्र तरीही प्रतिमाच्या मनात शंका असतेच त्यामुळे ती याबाबत सायली अर्जुनला सांगायचं ठरवते.
दुसरीकडे सगळी जण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. अश्विन खूपच नाराज असतो. तो म्हणतो की या सर्व प्रकारावरून मला एक गोष्ट कळली की माझ्या नशिबात खरं प्रेम नाही. तेव्हा कल्पना आणि प्रताप त्याला समजावत असतात. सायली अर्जुन तिथे येतात तितक्यात त्यांना प्रतिमा फोन करते. फोन स्पीकरवर असतो त्यामुळे घरातले सगळे जण त्यांचे संभाषण ऐकतात. प्रतिमाने सायली अर्जुन ला घरी बोलावलेलं असतं. मात्र गेल्या काही दिवसात सायली अर्जुन बाबत घडलेल्या घटनांमुळे कल्पना अस्वस्थ असते. ती त्यांना बाहेर कुठेच जाण्याची परवानगी देत नाही. ती प्रतिमाला म्हणते की मी उद्या मंदिरात अभिषेक घालण्याचा ठरवलं आहे त्यासाठी तू सुद्धा तिथे ये. गेल्या काही दिवसात अर्जुन सायलीवर आलेल्या संकटांमुळे मला फारच भीती वाटते त्यामुळे मी ही पूजा करायची ठरवली आहे. प्रतिमा तिथे यायला तयार होते. सायलीला मात्र प्रतिमा आपल्याशी काय बोलायचं असेल असा प्रश्न पडतो.
कल्पना आणि काही सामान आणायला सांगितलेलं असतं ते विमल घेऊन येते आणि प्रियाला नेऊन देते. प्रियाला वाटतं की घरातल्यांनी तिच्यासाठी जेवण पाठवला आहे पण खरं तर त्यामध्ये सगळं सामान असतं. त्यामध्ये कांदा, तांदूळ, डाळ असं जिन्नस वेगवेगळ्या पुड्यांमध्ये बांधून दिलेले असतात. त्यामुळे प्रियाचा मोठा पचका होतो. विमल सांगते की हे सगळं तुम्हाला स्वतः करून खायचं आहे. आता सध्या पुरतं तुम्हाला हे समान पाठवलं आहे पण नंतर तुम्हाला तुमचं सगळं आणावं लागेल. प्रियाकडे ते मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो त्यामुळे ती ते सामान घेते पण तिची चिडचिड चालू असते.
Tharala Tar Mag दुसरीकडे तुरुंगात महिपत इतका चांगला वागतो की नागराज ला सुद्धा त्याच्या वागण्यावर प्रश्न पडतो. तो त्याला उसकावण्याचा प्रयत्न करतो की तू महिपत शिखरे आहेस. तुझ्या नुसत्या नावाने सगळे चलचळ कापतात आणि तू अचानक इतका बदलला! यावर महिपत शांतपणे म्हणतो की डोक्यावर बर्फ ठेवायला शिका. मागे एका कैद्याला त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे घरी सोडलं गेलं. कदाचित पुढचा नंबर माझा असेल. हे मारामारी, जीव घेणे यांसारखे प्रकार करून काहीही मिळत नाही. हे असले प्रकार करून मी तुरुंगात आहे आणि माझी लेक तिथे घरात लपून बसली आहे. मी ठरवलं आहे की येता चांगला वागायचं आणि इथून बाहेर पडायचं त्यानंतर लेकी सोबत सुखाने आयुष्य घालवायचं. महिपत इतका चांगला वागला तर आपण तुरुंगात असेच राहू या विचाराने नागराज घाबरतो. त्याला काहीही करून पुन्हा एकदा गुंड बनवलच पाहिजे असा विचार तो करू लागतो.
तर दुसरीकडे प्रिया नाईलाजाने सगळं काम स्वतः करत असते ते सायली अर्जुन पाहत असतात. सायली म्हणते की आणखी दोन-तीन दिवसांमध्ये तिच्यावर अशी काही वेळ येईल ज्यामुळे ती कोणालाच स्वतःच तोंड दाखवू शकणार नाही.

