Dailyhunt
Tharala Tar Mag : सुभेदारांसमोर येतायत प्रियाचे कारनामे, नुपूर-गिरीजानं खोट्या तन्वीला केलं पळता भुई, सायलीनंही चांगलीच जिरवली

Tharala Tar Mag : सुभेदारांसमोर येतायत प्रियाचे कारनामे, नुपूर-गिरीजानं खोट्या तन्वीला केलं पळता भुई, सायलीनंही चांगलीच जिरवली

मुंबई - 'ठरलं तर मग' मालिकेच्या ३० एप्रिलच्या एपिसोडमध्ये प्रियाला मीना वहिनीचा फोन येतो. प्रिया मीनाला पूर्णा आजीला दिलेल्या काढ्याची रेसिपी सांगते. नुपूर प्रियाचं बोलणं रेकॉर्ड करते.

प्रिया मीनाकडे स्वतःच्याच कारनाम्यांची कबुली देते. नुपूरला सगळं ऐकल्यावर धक्का बसतो.

पुढे, नुपूर सायलीला फोन करते आणि मीना आणि प्रियाच्या फोनबद्दल सांगते. नुपूर सायलीकडे प्रियाच्या कारनाम्यांचा पाढा वाचते. 'तू प्रियाला कुठलीच सूट देऊ नकोस' असं नुपूर प्रियाला सांगते. सायली आणि नुपूर प्रियाच्या विरोधात प्लॅन बनवतात. सायली, गिरीजालाही प्लॅनमध्ये सामील करून घेते. दुसऱ्यादिवशी सकाळी प्रिया सगळे नाश्ता करत बसलेले असतात. प्रिया मुद्दाम ताप आल्याचं नाटक करते आणि अश्विनला ताप तपासायला सांगते. पण अश्विन प्रियाला भिक घालत नाही. तेवढ्यात नुपूर आणि गिरीजा येतात.

गिरीजा आणि नुपूर म्हणतात, 'आम्ही आता प्रियाला भेटायला आलोय' नुपूर, मुद्दाम प्रियाची चौकशी करते. सायलीनं सांगितल्याप्रमाणे नुपूर आणि गिरीजा काढा घेऊन येतात. प्रिया काढा प्यायला तयार नसते. पण, गिरीजा आणि नुपूर जबरदस्ती प्रियाला काढा पाजतात. प्रिया, आकांडतांडव करते. सुभेदारांना नुपूर आणि गिरीजाच्या प्लॅनबद्दल काहीच समजत नाही. त्यावर दोघीही प्रियाच आपल्याला सगळं सांगेल असं म्हणतात. नुपूर प्रियाला म्हणते, 'हा असाच काढा तू पूर्णा आजीला दिला होतास. त्यांना बरं नव्हतं, त्यांना त्रास होईल म्हणून तू मुद्दाम हा काढा दिलेलास.'


प्रिया, साळसूदपणाचा आव आणते. नुपूर, मीना आणि प्रियाच्या फोन कॉलचा व्हिडिओ सुभेदारांना दाखवते. ते बघून सगळ्यांना धक्का बसतो. नुपूर आणि गिरीजा प्रियाच्या कानशिलात लगावतात. अश्विन म्हणतो, 'ही मुलगी माझी बायको आहे, हा विचारच मला सहन नाही होत' अर्जुन, अश्विनला खोलीत घेऊन जातो. प्रिया घरात येते आणि मुद्दाम नाटक करायला सुरुवात करते. प्रिया, अश्विनला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. अश्विनही प्रियाला घराबाहेर जायला सांगतो. प्रिया ऐकत नाही. शेवटी, सायली जिन्यावर येऊन प्रियाला खाली ढकलते.


प्रिया सायलीला म्हणते, 'तू आता मला ठार मारण्याचा प्रयत्न केलास' त्यावर सायली म्हणते, 'म्हणजे जेव्हा तू मला जिन्यावरून ढकललं होतंस तेव्हा तूसुद्धा मला ठार मारण्याचा प्रयत्न केलेलास का?' हे ऐकून प्रियाची घाबरगुंडी उडते. सायली सगळ्यांना सांगते, 'जेव्हा मी जिन्यावरून पडले होते, तेव्हा तो अपघात नव्हता. प्रियाने मला ढकललं होतं' नुपूर पुन्हा प्रियाचा व्हिडिओ सर्वांना दाखवते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims