Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Toxic Box Office Collection  Day 1: रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर 'टॉक्सिक'चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मोडले अनेक रेकॉर्ड्स, कमाई किती?

Toxic Box Office Collection Day 1: रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर 'टॉक्सिक'चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मोडले अनेक रेकॉर्ड्स, कमाई किती?

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता यश याच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटानं थिएटर्समध्ये प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढत प्रेक्षकांना तसंच ट्रेड विश्लेषकांना थक्क केलं आहे.

पहिल्या दिवशीची एकूण कमाई किती?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'टॉक्सिक' चित्रपटानं पहिल्या दिवशी संपूर्ण भारतात सर्व भाषांमध्ये मिळून सुमारे १०१.१० कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला जमवला आहे. भारतामधील ग्रॉस कलेक्शन १२०.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही यशच्या या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळाली.

पहिल्याच दिवशी भारताबाहेरील मार्केटमधून चित्रपटानं तब्बल २० कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे 'टॉक्सिक'चं जगभरातील पहिल्या दिवशीचं एकूण कलेक्शन १४०.७५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

'टॉक्सिक' हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर कन्नड, हिंदी, तेलगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मूळ भाषा कन्नडपेक्षा हिंदी भाषिक पट्ट्यात या चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.

हिंदी: ५५.०० कोटी , कन्नड: २३.३० कोटी तेलगू: १६.०० कोटी, तमिळ: ५.५० कोटी ,मल्याळम: १.३० कोटी, अशी कमाई सिनेमांनं केली आहे.

मोठे विक्रम मोडीत

पहिल्याच दिवशी १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'टॉक्सिक' हा ६ वा चित्रपट ठरला आहे. याआधी 'पुष्पा २', 'केजीएफ २', 'आरआरआर', 'बाहुबली २' आणि 'धुरंधर २' या सिनेमांनी पहिल्या दिवशी मोठी कमाई करत या यादीत स्थान मिळवलं होतं. यासोबतच यशनं पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या दिग्गज स्टार्सच्या यादीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

स्टार कास्ट आणि कथानक

गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एक डार्क आणि अ‍ॅक्शननं भरपूर असणारी गँगस्टर ड्रामा थीमवर आधारित आहे. या चित्रपटात यशसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी , नयनतारा , तारा सुतारिया , हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत मुख्य भूमिकांमध्ये आहेत.


सोशल मीडिया रिव्ह्यू

काल पहिल्या दिवशी सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा सिनेमा आवडला आहे , तर अनेकांनी या सिनेमाला तीन तासांचं टॉर्चर म्हणत खिल्ली उडवली आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims