Dailyhunt
Trump Tariffs: जग संकटात असताना ट्रम्प देणार फार्मा टॅरिफचा कडू डोस; युद्धाच्या सावटात वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत

Trump Tariffs: जग संकटात असताना ट्रम्प देणार फार्मा टॅरिफचा कडू डोस; युद्धाच्या सावटात वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत

Tariffs on Drugmakers: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने भारतीय शेअर बाजारातील औषधनिर्माण क्षेत्राला धक्का बसला आहे. अमेरिकेत येणाऱ्या ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

होय, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे, अमेरिकेत औषधांच्या कमी किमतींची हमी देणाऱ्या करारांवर स्वाक्षरी न केलेल्या कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकतो असा ब्लूमबर्गने आपल्या अहवालात दावा केला आहे.

ट्रम्प पुन्हा जगाला देणार टॅरिफचा कडू डोस

ट्रम्प प्रशासन आयात होणाऱ्या ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर 100% पर्यंत शुल्क लादण्याचा विचार करत असल्याने ब्लूमबर्गने अहवालातून दावा केला आहे. अशा परिस्थितीत, या संभाव्य निर्णयामुळे जागतिक औषध कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन वाढवून साठा करण्यास सुरुवात केली असून ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा अमेरिकेत औषधे पाठवणाऱ्या भारतीय कंपन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी गेल्या वर्षी दिलेल्या धमक्यांचीच अंमलबजावणी म्हणून प्रस्तावित शुल्कवाढ केली जाऊ शकते. 'जोपर्यंत औषध उत्पादक स्थानिक पातळीवर उत्पादन सुविधा उभारणार नाहीत, तोपर्यंत ब्रँडेड किंवा पेटंट असलेल्या औषधांच्या आयातीवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते,' असे त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटले होते. अशा परिस्थितीत, नवीन शुल्क 1962 च्या Trade Expansion Act च्या कलम 232 अंतर्गत करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक चौकशीनंतर नवीन शुल्क लादले जाऊ शकते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ही चौकशी सुरू केली गेलेली.

ट्रम्प फार्मा टॅरिफमधून काही कंपन्यांना सूट
त्याचवेळी, ट्रम्प यांच्या नव्या फार्मा टॅरिफमधून काही कंपन्यांना दिलासा मिळू शकतो, या कंपन्यांनी आधीच करार केले आहेत ज्यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश आहे.

फायझर आणि ॲस्ट्राझेनेका: या कंपन्यांनी कमी किमती आणि नवीन TrumpRx.gov प्लॅटफॉर्मला वचनबद्धता दर्शवून अनेक वर्षांसाठी शुल्कातून सूट मिळवली आहे.

एली लिली, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मर्क: शुल्क टाळण्यासाठी या कंपन्यांनी अमेरिकेतील आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे.

टॅरिफच्या भीतीपोटी फार्मा कंपन्यांचे शेअर्स कोसळले

निफ्टी फार्मा निर्देशांकामध्ये बायोकॉन लिमिटेड टॉप लुजर ठरली आणि शेअर 5% हून अधिक घसरले. याशिवाय ग्लेनमार्क फार्मा लिमिटेड, ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, सन फार्मा लिमिटेड आणि इप्का लॅब्स लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4% हून अधिक घसरण नोंदवली गेली.

अमेरिका औषध उत्पादनांसाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे भारतीय कंपन्या जेनेरिक औषधांची विक्री करतात आणि अमेरिकेतील विक्रीचा या कंपन्यांच्या एकत्रित महसुलात मोठा फायदा होतो. अशा स्थितीत, ट्रम्प प्रशासनाने निर्णय लागू केल्यास त्याचा भारतासह जागतिक औषधनिर्माण उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच, यामुळे औषधनिर्माण कंपन्यांच्या धोरणांमध्येही मोठा बदल होऊ शकतो.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims