Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'तुझी बोटं तोडून टाकेन', दारूच्या नशेत तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, मित्राला दिल्या मारण्याच्या धमक्या, व्हिडीओ व्हायरल

'तुझी बोटं तोडून टाकेन', दारूच्या नशेत तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, मित्राला दिल्या मारण्याच्या धमक्या, व्हिडीओ व्हायरल

Delhi Tourists: उत्तराखंडमधील मुसुरी येथे दारूच्या नशेत एका तरुणीनं पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. तिनं पोलिसांसमोर आपल्या मित्राची बोटं तोडून टाकण्याची धमकी दिली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

तसंच नेटकरी तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.


दारू शरीरासाठी किती हानिकारक आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. नुसतं इंटरनेटवर 'दारू' हा शब्द सर्च करा, तुम्हाला याबाबत ढिगभर माहिती मिळेल. पण दुष्परिणाम माहीत असतानाही लोक सर्रास दारूचं सेवन करतात आणि मग पुढे काय घडतं, हे तुम्ही या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता. एका तरुणीनं दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. एवढंच नाही, तर तिनं पोलिसांसमोरच आपल्या मित्राचं बोट तोडून टाकण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, या मद्यधुंद तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
(फोटो सौजन्य - @ImSoniya24/x.com)हे प्रकरण काय आहे?​



हा व्हिडीओ @ImSoniya24 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना उत्तराखंडमधील मुसुरी येथे घडली आहे. दिल्लीहून चार मित्र-मैत्रिणी पर्यटनासाठी मुसुरीला आले होते. दरम्यान त्यांनी मद्यपान केलं. मात्र, या गटातील एका तरुणीला दारूची नशा खूपच झाली होती. त्यामुळे नशेच्या धुंदीत तिनं आपल्या मित्रांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मित्रांनाही तिला आवरणं कठीण झालं. त्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी चौघांनाही जवळच्या पोलीस ठाण्यात नेलं. मात्र, तेथेही तरुणीचा ताबा सुटला आणि तिनं पोलिसांसमोरच आपल्या मित्राला बोटं मोडून टाकण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण संयमानं हाताळलं.
पोलिसांनी दिलं समुपदेशन​



या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी या तरुणांवर कोणतीही कारवाई केली नाही. रात्रीची वेळ होती आणि तरुणी मद्यधुंद अवस्थेत होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांचं समुपदेशन करून त्यांना सोडून दिलं. काही वेळाने नशा उतरल्यावर चौघांनीही पोलिसांची माफी मागितली. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून, या तरुणांवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे होती, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.

(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims