मुंबई : ज्याची संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला. भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
या पदार्पणासह त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात वैभवला संधी मिळणार का, याची उत्सुकता होती. अखेर टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि वैभवने भारताची निळी जर्सी परिधान करत मैदानात पाऊल ठेवले. या सामन्यात भारताने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
सचिनचाही विक्रम मागे
आयपीएलमध्येच दाखवली होती झलक
भारताची प्लेइंग इलेव्हन
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्तीइंग्लंड प्लेइंग इलेव्हन
फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, जोश टंग
